प्रतिष्ठा न्यूज

योगीजींच्या सभेनंतर संजयकाका पाटील यांचा प्रचार सुसाट ; अमित शहा आज विट्यात; नितीन गडकरी उद्यापासून दोन दिवस मतदार संघात दौरा

प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि.२: देशातील लाखो तरुणांचे हृदयसम्राट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सांगलीत जंगी सभा झाल्यानंतर भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांचा प्रचार आता सुसाट सुटला आहे. योगीजीनीच संजयकाका हे तिसऱ्यांदा सांगली मतदारसंघातून प्रचंड मताधिक्य मिळवून खासदार झाल्याचेच जाहीर केल्यामुळे कार्यकर्ते आता प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात सर्वत्र गतीने धावत आहेत. योगीजींच्या घोषणेतील आत्मविश्वासाने कार्यकर्तेही भारून गेले आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शुक्रवारी सांगली लोकसभा मतदारसंघात येत आहेत. संजयकाका पाटील यांच्या प्रचारासाठी विटे येथे दुपारी दोन वाजता त्यांची सभा होणार आहे. सांगली जिल्ह्यात संजयकाका पाटील यांच्या पुढाकाराने आणि पाठपुराव्यामुळे पाच राष्ट्रीय महामार्ग गेले आहेत. या महामार्गांमुळे जिल्ह्यातील सर्व तालुके परस्परांशी आणि बाहेरच्या जिल्ह्यांची जोडले गेले आहेत. त्यामुळे प्रवासी आणि मालवाहतुकीत सुलभता आली आहे. या राष्ट्रीय महामार्गासाठी संजयकाकांना सातत्याने प्रोत्साहन आणि मदत करणारे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी शनिवारी आणि रविवारी सांगली लोकसभा मतदारसंघात दौऱ्यावर येत आहेत. सांगली, जत, मिरज, अशा त्यांच्या सभा आणि बैठका होत आहेत.
सांगलीतील चिंतामणराव कॉमर्स कॉलेजच्या मैदानावर योगीजींची सभा झाल्यानंतर संजयकाका पाटील यांच्या प्रचाराची गाडी आता थांबायलाच तयार नाही. सर्वत्र जोरदार वातावरण तयार झाले आहे. अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांच्यावर संजयकाका पाटील यांनी थेट टीका करून त्यांच्या प्रचारातील हवाच काढल्याची चर्चा आता लोकात चर्चा सुरू आहे. घराण्यात बारा वेळा खासदारकी, अनेकदा आमदारकी तसेच विविध संस्थांची अध्यक्षपद मिळाल्यानंतरही हे घराणे उपेक्षित कसे, असा सवालच संजयकाकांनी विचारला आहे. त्याचबरोबर बँक, साखर कारखाना, फळ प्रक्रिया उद्योग, दूध संघ, सूतगिरणी, शेंगदाण्याचे तेल काढण्याची गिरणी अशा अनेक संस्था ज्या घराण्यातील वारसदारांनी मोडून खाल्ल्या त्यांनी आता अन्याय झाल्याची भाषा करू नये, असा इशारा संजयकाकांनी दिला. त्यामुळे तर विरोधकांकडील प्रचाराचे मुद्देच संपुष्टात आल्याची चर्चा आहे.
संजयकाका पाटील यांच्या प्रचारासाठी सांगली लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या सांगली, मिरज , जत, कवठेमंकाळ – तासगाव,खानापूर -आटपाडी, पलूस- कडेगाव या विधानसभा मतदारसंघात कार्यकर्ते आता घरोघर माहितीपत्रके पोचवत आहेत. त्याचबरोबर मतदारांना स्लिपचे वाटपही सुरू आहे. संजयकाका आणि भारतीय जनता पक्ष महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा आता प्रचाराच्या शेवटचा टप्पा सुरू झालेला आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.