प्रतिष्ठा न्यूज

शिक्षकांचे प्रश्न सोडविणाऱ्या संजयकाका पाटील यांनाच शिक्षकांची साथ : डॉ. प्रशांत कोल्हे; भाजपा शिक्षक आघाडीची बैठक

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : शिक्षकांचे प्रश्न सोडविणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांनाच सर्व शिक्षक साथ देतील, असा विश्वास भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रशांत कोल्हे यांनी व्यक्त केला.
भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ सांगली येथील संपर्क कार्यालयात भाजपा शिक्षक आघाडीची बैठक घेण्यात आली या बैठकीत डॉ. प्रशांत कोल्हे बोलत होते. ते म्हणाले, भाजप शिवाय यापूर्वी जे जे सरकार आले त्यांनी शिक्षकांना कधीच न्याय मिळवून दिला नाही उलट शिक्षकांच्यावर अन्याय कसा होईल अशाच प्रकारचे निर्णय त्यांनी घेतले परंतु भारतीय जनता पार्टीने सत्तेत आल्यानंतर शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडविले त्यांना आधार दिला अनेक शाळांना अनुदानित केले त्यामुळे अनेक शिक्षकांच्या रोजी रोटीचा प्रश्न मिटला शिक्षक हा समाजात परिवर्तन घडवून आणणारा घटक आहे त्यामुळे शिक्षकांना साथ देणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांनाच आपण सर्वांनी साथ द्यायचे आहे आणि आपण देणार आहात असा मला विश्वास आहे असे श्री कोल्हे म्हणाले.
यावेळी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, भाजपा शिक्षक आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. नारायण राजुरवार, सांगली जिल्हाध्यक्ष उत्तमराव पाटील विभागीय सहसंयोजक विजय काटकर सांगली शहर जिल्हाध्यक्ष महेश पाठक यांच्यासह विविध मंडळाचे संयोजक व सहसंयोजक या बैठकीस उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.