प्रतिष्ठा न्यूज

तळागाळापर्यंत विकास कामे पोहोचवलेल्या संजय काकांना निवडून द्या : सुमनताई खाडे; मिरज तालुक्यात ज्योतीताई पाटील, वैष्णवी पाटील यांचा प्रचार दौरा

प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनेक योजना च्या माध्यमातून विकास करणे तळागाळापर्यंत पोहोचवणाऱ्या खासदार संजय काका पाटील यांना विजयी करा असे आवाहन पालकमंत्री सुरेश शभाऊ खाडे यांच्या सुविध्य पत्नी सुमनताई खाडे यांनी केले.
मिरज तालुक्यातील मल्लेवाडी, एरंडोली, लक्ष्मीवाडी, शिपुर बेळंकी, शिरोळे मळा, चव्हाण मळा या परिसरात भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांचे प्रचारार्थ सौ. ज्योतीताई संजयकाका पाटील, युवानेत्या वैष्णवी दीदी पाटील यांनी बैठका घेतल्या, यावेळी सुमनताई खाडे बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजना खासदार संजयकाका पाटील यांनी तळागाळापर्यंत पोहोचवल्या.
जिल्ह्यामध्ये विकासाची कामे केली. रस्ते,पाणी, पंतप्रधान आवास योजना उज्वल गॅस योजना या योजनेचा नागरिकांना लाभ दिला. सामान्य माणसासाठी विकास योजना राबवणाऱ्या खासदार संजय काका पाटील यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे.
या दौऱ्यात भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेश पदाधिकारी ज्योतीताई कांबळे, सरपंच सारिका महेश शिंदे, उपसरपंच महेश मोरे, ग्रामपंचायत सदस्य मंजू पोखरणीकर, वैशाली कांबळे, दौलत कांबळे, चंद्रकांत बुवा, नेताजी गडदरे, महेश कुमार शिंदे, सुरेश कोष्टी, रविकिरण शिरोळे, आबा वंजारी, सर्व सदस्य, सर्व माजी सैनिक, सरिता चव्हाण, हाऊसिंग सोसायटी सुभाषनगरचे व्हा. चेअरमन यमगर गुरुजी, पक्षाचे कार्यकर्ते राजू माने, सुनील पाटील, राधिका खटावे, शैलजा शरदवाडे, नंदा माळी, मनिषा बनसोडे,यांच्यासह महिला, नागरिक व पदाधिकारी या दौऱ्यामध्ये सहभागी झाले होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.