प्रतिष्ठा न्यूज

पंढरपूर सिंहगडच्या ११ विद्यार्थ्यांची “सायबर सक्सेस” कंपनीत निवड

प्रतिष्ठा न्यूज
पंढरपूर प्रतिनिधी : आजच्या डिजिटल युगात जवळपास प्रत्येक व्यवसायाने आपली संस्थात्मक रचना स्वयंचलित केली आहे. इंटरनेटच्या माध्यमातून होणारी फसवणूक अथवा अन्य गोष्टीवर सायबर सक्सेस हि कंपनी काम करत आहे. अशा या कंपनीत पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मधील ११ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभाग प्रमुख
प्रा. अनिल निकम यांनी दिली.
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी, पंढरपूर महाविद्यालयातील आकाश भारत पिसे, क्षितिजा मनोज पुरवत, संध्या उत्तम घाडगे, सौरभ बाळासाहेब लिंगे, निवेदिता शांतीनाथ बागल, सुप्रिया तुकाराम काशिद, रूतुपर्णा रणजित लावंड, शुभम दत्तात्रय मंगळवेढेकर, स्नेहल वसंत पाटणे, प्राजक्ता पाटील, पल्लवी मिसाळ आदी ११ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली आहे.
“सायबर सक्सेस” कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. राजेंद्र पाटील, प्रा. अभिजित सवासे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.