प्रतिष्ठा न्यूज

खोकुर्ले गावात पुन्हा पुन्हा भरवस्तीत बिबट्याचा शिरकाव गावात थरथराट : वनविभागास निवेदन

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : खोकुर्ले ता.गगनबावडा येथे गावात भर वस्तीत घुसून बिबट्याने उच्छाद मांडला आहे. गावात प्रचंड दहशत निर्माण केली आहे. ‘ बिबट्या आला रे आला’ म्हणत संपूर्ण गावात थरकाप उडाला आहे.
काल मध्यान रात्री बिबट्याने भरवस्तीत लक्ष्मण येसबा पाटील यांच्या घराबाहेर कुत्र्यावर हल्ला करून कुत्रे फस्त केले .तसेच यशवंत तुकाराम पाटील यांच्या घराभोवतीही बिबट्याने फिरून कुत्र्यावर हल्ला केला.त्यामुळे नागरिकांच्यात आणखी भीतीचे वातावरण पसरले आहे.
गावामध्ये गेले महिना- दोन महिने बिबट्याने भर वस्तीत गावात घुसून अनेक पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्यांना फस्त केले आहे. भरवस्तीत बिबट्या घुसल्याने आम्ही जगायचे कसे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
चारच दिवसांपूर्वी गावातील शेतमजूर धोंडीराम गायकवाड यांच्या घराजवळील गोठ्यामध्ये बिबट्याने शेळी ठार मारून नेली होती . तसेच बाळू कसबले यांच्या गोठ्यात जाऊन कुत्र्यावर हल्ला केला होता.याबाबत वनविभागाने लावलेल्या सी.सी.टी.व्ही.मध्ये बिबट्या स्पष्ट दिसत आहे.
बिबट्याच्या मानवी वस्तीमध्ये प्रवेशाने नागरिक व शेतकरी वर्गामध्ये घबराट पसरली आहे. खोकुर्ले गावामधील शेतकरी व दुग्धव्यवसाय करणारे नागरिक या चिंतेने धास्तावले असून जनावरांची वैरण व शेतकाम करण्यास घाबरत आहेत. याबाबत आपण तात्काळ कार्यवाही करून बिबट्यास पकडून योग्य ठिकाणी सोडण्यात यावा.
याबाबतचे निवेदन वनकर्मचारी संग्राम पाटील ,पांडुरंग पाटील,आनंदा पाटील यांना ग्रामस्थाच्या वतीने देण्यात आले.यावेळी सरपंच सुनिता कांबळे ,रामचंद्र पाटील,बाजीराव पाटील,रंगराव पाटील, संदीप पाटील, प्रकाश पाटील ,पोलिस पाटील कैलास इंजर ,विष्णू पाटील ,अजित पाटील,रामचंद्र हरुकले , बाबुराव कांबळे यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.