प्रतिष्ठा न्यूज

पंढरपूर सिंहगड सिंहगड मध्ये सोमवारी इंडियन एअरफोर्सच्या कार्यशाळेचे आयोजन

प्रतिष्ठा न्यूज
पंढरपूर प्रतिनीधी : कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर महाविद्यालयात सोमवार दिनांक ६ मार्च २०२३ रोजी इंडियन एअरफोर्सची कार्यशाळा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डाॅ. समीर कटेकर यांनी दिली.
अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना इंडियन एअरफोर्स मध्ये नोकरीच्या संधी याविषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत १८ वेगवगळे कमांड विविध वरीष्ठ पदावरील पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या कार्यशाळेत इंडियन एअरफोर्स मध्ये करिअरच्या अनेक संधी या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. तसेच इंडियन एअरफोर्स चे कर्मचारी येताना वाल्वो वाहन घेऊन येणार आहेत. यामधुन प्रत्येक २४ विद्यार्थ्यांचा ग्रुप करून यामधुन प्रात्यक्षिक द्वारे माहिती देण्यात येणारे आहे.
हि कार्यशाळा पंढरपूर परिसरातील महाविद्यालय व शाळेतील विद्यार्थ्यांसाठी खुली ठेवण्यात आली असून सोमवार दिनांक ६ मार्च २०२३ रोजी सकाळी ९ ते ४ या वेळेत संपन्न होणार आहे.
या कार्यशाळेचा लाभ पंढरपूर परिसरातील महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.