प्रतिष्ठा न्यूज

तासगावसह परिसरात अवैधरित्या गुटखा,सुगंधी तंबाखू पुरवणाऱ्या टोळीवर कारवाई करा : मनसेच्या अमोल काळे यांचें पोलीस स्टेशनला निवेदन

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : महाराष्ट्रामध्ये गुटखा बंदी असताना तासगावसह परिसरात मात्र परराज्यात उत्पादित होणारा गुटखा, सुगंधी तंबाखू,आदि पदार्थ पुरवठा करणारी टोळी तासगाव शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात सक्रीय असल्याचे दिसत आहे.याबाबत आज मनसे नेते अमोल काळे यांनी तासगाव पोलीस स्टेशनला निवेदन देऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.त्यात त्यांनी म्हंटले आहे हि टोळी परराज्यातून मोठ्या प्रमाणावर गुटख्याची आणि सुगंधी तंबाखूचीं खरेदी करून तासगाव मध्ये साठा करून तालुक्यातील अनेक दुकानदारांना वाढीव दराने राजरोस पणे विक्री करत असल्याचे दिसत आहे.शासनाकडून अवैध्य गुटखा वाहतूक करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाही करण्याचे निर्देश असूनही तासगाव मध्ये कोणतीही कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही.त्याचाच फायदा घेत संबधित तस्करी करणारी टोळी मोटारसायकलचा वापर करून राजरोसपणे ग्रामीण भागात वितरीत करत आहेत.
त्यामुळे तालुक्यातील युवापीढी व्यसनाधीन होत आहे तरी आपण या विषयांत स्वतः हा लक्ष देवून संबधित तस्करी करणाऱ्या टोळीवर कठोर कारवाई करावी.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.