प्रतिष्ठा न्यूज

सांगलीसाठी आलेल्या नवीन शंभर बसेसमुळे प्रवाशांची चांगली सोय होईल : खा.संजयकाका पाटील; तासगावात पूजन

प्रतिष्ठा न्यूज /किरण कुंभार 
तासगाव : जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या  मागणीनुसार शासनाकडे पाठपुरावा करून 100 नवीन बसेस सांगली जिल्ह्यासाठी उपलब्ध झाले आहेत  या अद्यावत व  सर्व सोयीनीयुक्त नवीन बसेसमुळे प्रवाशांची चांगली सोय होईल व प्रवास सुखकर होईल,त्याचबरोबर येत्या काही दिवसातच आणखी  100 इलेक्ट्रिक बसेस सांगली जिल्ह्याला उपलब्ध होतील अशी ग्वाही खासदार संजय (काका) पाटील यांनी दिली. तासगाव एसटी आगार साठी उपलब्ध झालेल्या नवीन वीस गाड्यांचे पूजन व लोकार्पण सोहळा तासगाव आगार येथे पार पडला.यावेळी आयोजित कार्यक्रमात खासदार संजय काका पाटील बोलत होते.यावेळी युवा नेते प्रभाकर (बाबा) पाटील एस.टी. चे विभाग नियंत्रक सुनील भोकरे,डेपो मॅनेजर दयानंद पाटील विभागीय वाहतूक अधिकारी वृषाली भोसले यांच्या बरोबरच तासगावचे तहसीलदार रवींद्र रांजणे,पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ,बिडीओ अविनाश मोहिते,राजमुद्रा ग्रुपचे एमडी ज्ञानेश्वर पाचुंदकर यांच्यासह अधिकारी कर्मचारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी बोलताना खासदार संजय (काका) पाटील यांनी बसेस उपलब्ध करून दिल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे आभार मानले ते म्हणाले लालपरीचा नागरिकांशी अजूनही स्नेह आहे, विद्यार्थ्यांच्या पासून ते वृद्धांपर्यंत  सर्वांशी एसटीची नाळ जुळलेली आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या प्रयत्नांमुळे महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास या योजना सुरू आहेत ज्याचा सर्वसामान्य लोकांना फायदा होतो आहे.ते म्हणाले पूर्वीच्या काळी संध्याकाळी मुक्काम गाडी प्रत्येक गावात असायची गावातील एखाद्या व्यक्तीची तब्येत बिघडली किंवा एखादी दुर्घटना घडली तर या बसेस चा शहरात जाण्यासाठी वापर केला जात होता आज ही ग्रामीण भागातील विद्यार्थी पूर्णपणे शिक्षणासाठी एस.टी.वर अवलंबून आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यामुळे पूर्ण क्षमतेने एसटी चालली पाहिजे.यावेळी खासदार संजय (काका) यांनी तासगाव तालुक्यातील एकूण बसेसची संख्या बसेसच्या फेऱ्या विद्यार्थ्यांची वाहतूक त्यासाठीच्या ज्यादा फेऱ्या यासंदर्भात अधिकाऱ्यांची चर्चा केली त्याचबरोबर विद्यार्थिनींना ज्यादा वेळ थांबायला लागू नये या पद्धतीने बसेस उपलब्ध करून देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या.नवीन वाढलेल्या बसेसमुळे तासगाव तालुक्यातील बस फेऱ्यात व पूर्ण क्षमतेने होतील अशी ग्वाही यावेळी अधिकाऱ्यांनी खासदार संजय काकांना दिला.यावेळी माजी शहराध्यक्ष माणिक जाधव,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक महादेव (नाना) पाटील,माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य सुखदेव पाटील,भाजपा उपाध्यक्ष सांगली जिल्हा बाबासाहेब पाटील,तासगांव शहराध्यक्ष हणमंत पाटील, माजी समाजकल्याण सभापती प्रमोद शेंडगे, माजी पं.स.सदस्य सुनिल जाधव, माजी नगराध्यक्ष अविनाश पाटील, जाफर मुजावर,दिग्विजय पाटील, महादेव पाटील,अरुण साळुंखे,रोहन कांबळे, तुषार हुलवाणे, शशिकांत जमदाडे, उमेश गावडे, संजय लुगडे अनिल चव्हाण आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
100 इलेक्ट्रिक बस 
सध्या सांगली जिल्ह्यासाठी 100 बसेस उपलब्ध झाल्या आहेत तासगावं ला 20, कवठेमंकाळ 17  आटपाडी 15 जत 25 विटा 23 इतक्या बसेस खासदार पाटील यांच्यामुळे उपलब्ध झाले आहेत त्याचबरोबर सांगली जिल्ह्यासाठी लवकरच 100 इलेक्ट्रिक बस मिळणार आहेत व यासाठी लागणारे चार्जिंग पॉइंट उभा केले जातील अशी माहिती यावेळी खासदार संजय काका पाटील यांनी दिली.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.