प्रतिष्ठा न्यूज

आयुक्ताकडून सांगलीतील उद्यानांची पाहणी – जाणून घेतल्या समस्या

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेत नव्यानेच रुजू झालेले आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी आपल्या कार्याची चुणूक अनेक कामांच्या माध्यमातून दाखवायला सुरुवात केली असून ,आयुक्तांच्या या कार्यपद्धतीवर महापालिका क्षेत्रातील नागरिक खुश असल्याचे जाणवत आहे.
आयुक्त शुभम गुप्ता यांनी सांगली शहरातील उद्यानांना आज सकाळी अचानक भेट देऊन सर्व सांगलीकरांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. सांगलीतील आमराई उद्यान त्रिकोणी बाग व महावीर उद्यान बापट मळा येथे भेट देऊन याठिकाणी फिरायला येणार्या नागरिकांशी त्यांनी सुसंवाद साधला. उद्यानात फिरायला येणाऱ्या व योगा करणाऱ्या नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. तात्काळ उद्यानातील अडचणी दूर केल्या जातील यासंबंधी आदेश करण्यात येतील असे त्यांनी सांगितले. उद्यानाची साफसफाई व सुरक्षितता, लहान मुलांची खेळणी तसेच व्यायामाची यंत्रसामुग्री याची दुरुस्ती व देखभाल , यासाठी शासकीय स्तरावरून योग्य ती कार्यवाही तसेच लोकसहभागातून नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जातील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. पावसाळ्यात चालण्याचा ट्रॅक चिखलीयुक्त व नादुरुस्त होतो योगा करण्यासाठी शेड नसलेल्या ठिकाणी शेड उभारण्यात याव्यात. दरवर्षी नवीन झाडे लावण्यात येऊन त्याची निगा राखण्यात यावी जुनी झाडे व गवती लाॅन यांची देखभाल दुरुस्ती व निगा राखण्यात यावी आमराई मध्ये ड्रेनेज तसेच पाण्याच्या पाईप फुटलेले आहेत त्यांची दुरुस्ती करण्यात येऊन सर्व आमराई मध्ये पाण्याचे व्यवस्थापन व्हावे ठिबक सिंचन केल्याने पाण्याची बचत होईल. अशा विविध विषयावर त्यांनी नागरिकांशी चर्चा केली.
हसत खेळत व हलक्या फुलक्या चर्चेतून तात्काळ निर्णय घेऊन त्यांनी सांगलीकर नागरिकांची मने जिंकली. स्वतःहून नागरिकांच्यात मिसळणारे त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणारे त्वरित निर्णय घेणारे असे आयुक्त प्रथमच सांगलीला लाभले आहेत अशा शब्दात अनेक नागरिकांनी त्यांचे कौतुक व अभिनंदन केले व धन्यवाद दिले.
यावेळी उद्यान अधीक्षक वैभव वाघमारे, उद्यान मुकादम दिलीप कांबळे, उद्यान मुकादम गोगा , लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे, डॉक्टर महेश शहा, बसवराज,, ( सियाराम ) पाटील,आणि त्रिकोणी बाग फ्रेंड सर्कल, त्रिकोणी बाग योगा ग्रुप आधी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.