प्रतिष्ठा न्यूज

गुजरात तुपाशी महाराष्ट्र उपाशी : महिला राष्ट्रवादीच्या वतीने शिंदे-फडणवीस सरकार विरोधात आंदोलन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : राष्ट्रवादी महिला काँग्रेस सांगली जिल्ह्याच्या वतीने आज उद्योग गुजरातच्या घशात घालणाऱ्या शिंदे फडवणीस सरकारच्या विरोधात *“गुजरात तुपाशी महाराष्ट्र उपाशी “* अश्या घोषणा देत निषेध आंदोलन सांगलीमध्ये महात्मा गांधी स्मारक , स्टेशन रोड सांगली येथे करण्यात आले.यावेळी महिला  राष्ट्रवादीच्या वतीने शिंदे-  फडणवीस सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

  यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा कविता म्हेत्रे, महिला सांगली जिल्हाध्यक्षा सुश्मिता जाधव , सांगली शहर अध्यक्षा अनिता पांगम , मिरज शहर अध्यक्षा वंदना चंदनशिवे , अनिता पाटील, मेघा पाटील, छाया जाधव, अनिता कदम, वंदना चंदनशिवे, अलका माने,वैशाली कळके ,  गीतांजली इरकर, उषा गायकवाड , वैशाली पाटील ,छाया पांढरे , चंपाताई जाधव सुजाता हेगडे आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.