प्रतिष्ठा न्यूज

नांदेड जिल्ह्यातील श्री सत्यवान अंभोरे यांना पहिले कुणबी प्रमाणपत्र वाटप

प्रतिष्ठा न्युज/ राजू पवार
जिल्हा प्रतिनिधी/ नांदेड : मराठा समाजाला कुणबीचे दाखले देऊन ओबीसीत समावेश करावा, या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील हे बेमुदत उपोषणाला बसले होते. माजी न्यायमूर्ती शिंदेंच्या अध्यक्षतेखाली शिंदे समिती सरकारने स्थापन केली आहे. त्यातील झालेल्या पडताळणी आदेशानुसार नांदेड जिल्ह्यातील पहिले कुणबी जातीचे ओबीसी प्रवर्गाचे प्रमाणपत्र सांगवी(नांदेड) येथील सत्यवान दिगंबरराव अंभोरे यांना भेटले.

शिंदे समिती नांदेड येथे १९६७ आधीचे व इतर मराठा कुणबी एकच

असल्याचे पुरावे तपासण्यासाठी आली होती. त्यावेळी अंभोरे यांनी वडिलांचा १९४८ चा जन्म दाखला, शाळा प्रवेशावर कुणबी असल्याचा पुरावा व सत्यवान अंभोरे यांच्या शाळा प्रवेशावर कुणबी असल्याचा पुरावा दिला होता. आहे.
त्यासाठी त्यांना त्यावेळेच्या आंदोलनकर्त्यांनी मदत केली. कुणबी म्हणून ओबीसी प्रमाणपत्र मिळण्यासाठी जे काही पुरावे लागणार होते, ते पुरावे सत्यवान अंभोरे यांनी माहिती व सुविधा केंद्रात दाखल केले असता त्यांना उपजिल्हाधिकारी विकास माने यांच्या स्वाक्षरीने प्रमाणपत्र वाटप केले. याप्रसंगी संभाजी ब्रिगेड चे माधवराव देवसरकर, संकेत पाटील,श्याम पा.कोकाटे,सदानंद पुयड,सुभाष कोल्हे आदिजण उपस्थित होते. दरम्यान, जिल्ह्यात प्रमाणपत्र वाटपाला आता चांगलाच वेग आला आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.