प्रतिष्ठा न्यूज

आर्य अबॅकस अँण्ड् वैदिक मॅथ्स् च्या यशस्वी वाटचाली नंतर अकॅडमीमध्ये सुंदर हस्ताक्षर वर्ग पाडव्याच्या महूर्तावर सुरू

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली: गेली ८ वर्षे महाराष्ट्र व कर्नाटक मध्ये अबॅकस क्षेत्रामध्ये आर्य अबॅकस अँण्ड् वैदिक मॅथ्स् असोसिएशन ने एक वेगळा ठसा उमटवला आहे. उत्कृष्ट फ्रेंचायंसी मार्फत एक दर्जेदार शिक्षण पद्धती आर्य अबॅकस ने सुरू केली आहे. हजारो विद्यार्थ्यांनी अनुभवलेला हा अनुभव सिद्ध अबॅकस कोर्स अगदी सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना अबॅकस शिकवून विद्यार्थ्यांची  एकाग्रता, कल्पनाशक्ती, आकलनशक्ती, सादरीकरण , अचूकता , श्रवणशक्ती , स्मरणशक्ती, गती, आत्मविश्वास अशा बौद्धिक क्षमता आश्चर्यकारकरीत्या सकारात्मक बदल झालेला हजारो विद्यार्थ्यांनी व पालकांनी अनुभवलेला आहे.
           याचप्रमाणे विद्यार्थ्यांना वळणदार अक्षर व स्वच्छ  लेखन यासाठी विशिष्ट अशा अभ्यासक्रमाची आखणी केलेली आहे. यामध्ये मराठी, इंग्रजी व कर्सिव्ह लिपीचा अभ्यासक्रम घेतलेला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना सुवाच्छ अक्षर लिहिण्याची चांगली सवय लागेल.विद्यार्थी मराठी माध्यमाचा , सेमी  किंवा इंग्लिश माध्यमाचा असो या सर्व विद्यार्थ्यांना सुंदर हस्ताक्षर वर्गाचा खूप फायदा होणार आहे. अशी माहिती संस्थेचे संस्थापक माननीय  विवेक संकपाळ यांनी दिली. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष योगेश शिनगारे, खजिनदार अर्चना संकपाळ, सेक्रेटरी अमित पोळ यांनी ही मुलांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या अद्भुत सुंदर हस्ताक्षर कोर्स करावा असे आवाहन केले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.