प्रतिष्ठा न्यूज

बी- फार्मसी प्रवेशासाठी ऊसतोड कामगाराचा मुलगा सचिन राठोड महाराष्ट्रातुन प्रथम : सर्व स्तरातून अभिनंदन

प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट
उमरा : लोहा तालुक्यातील धनजी तांडा उमरा येथील सचिन रामराव राठोड याने सन 2022 – 2023 मधील बी फार्मसी प्रवेश पात्र परीक्षेत (व्हीजे-ए ) मधुन महाराष्ट्रातुन प्रथम येण्याचा मान मिळविला असुन त्याचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
बंजारा समाजात जन्मलेल्या सचिन चे वडील एक गरीब ऊसतोड कामगार आहेत काम केल्याशिवाय पोट भरत नाही हे त्यांना लहानपणा पासुन माहीत होते, म्हणुन ही वेळ आपल्या मुलांवर येऊ नये म्हणून रामराव राठोड यांनी आपल्या मुलाला 10 वी पर्यंतचे शिक्षण गावातील शाळेतच दिले. वडिलांच्या कष्टाची जाण असलेला सचिन ही लहानपणापासूनच शिक्षणामध्ये हुशार होता, त्याने पुढील शिक्षण लातुर येथील दगडोजीराव देशमुख कॉलेज ऑफ फार्मसी आलमला, येथे सन 2021-2022 मध्ये प्रवेश 95.10 टक्के घेऊन प्रथम श्रेणीत डिप्लोमा फार्मसी उत्तीर्ण झाला.
व पुढील शिक्षण सन 2022-2023 मधील बी फार्मसी प्रवेशात तो काल लागलेल्या यादीमध्ये सचिन रामराव राठोड ( व्हीजे-ए ) मधून महाराष्ट्रातुन प्रथम क्रमांकात आला आहे.
सचिनच्या या यशा बद्दल त्याचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असुन, तो माजी ग्रामपंचायत सदस्य विंदल राठोड यांचा छोटा भाऊ आहे.
“प्रतिष्ठा न्यूज कडुन आपले अभिनंदन”

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.