प्रतिष्ठा न्यूज

सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती संगीताताई सोनवणे यांच्या प्रयत्नांमुळे छ. शिवाजी महाराज स्मारकासाठी 20 लाख रु.मंजूर

प्रतिष्ठा न्यूज
नाशिक प्रतिनिधी दि.18 : भारत देशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मारक (पुतळ्याची) नित्यनेम दरोरोज सकाळी साफ सफाई, पूजाअर्चा, पुष्पहार अर्पण करणारी महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरातील एकमेव महान व्यक्तिमत्व रणरागिणी मा.सौ.संगिताताई सोनवणे यांच्या सामाजिक कार्याची दखल महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय पक्षांनी,राजकारणी मोठ्या नेत्यांनी,प्रत्येक सामाजिक संघटना आणि संघटना च्या सर्व लहान मोठ्या पदाधिकारीनी,सर्व लहान मोठ्या सामान्य नागरिक,महिला,पुरुषांनी ताईचा आदर्श घेतलाच पाहिजे असे त्यांचे सामाजिक कार्य आहे. मा.सौ.संगीताताई सोनवणे यांच्या स्व:खर्चाने दरोरोज १४ वर्षापासून सतत महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार,पूजाअर्चा करण्यात येत आहे सौ.ताई महाराजांच्या पुष्पहार खरेदी साठी कोणाकडूनही एक रुपया न घेता त्या स्वतः काम करून स्वतःच्या पैशाने दरोरोज २५ रुपयाचा पुष्पहार विकत घेवून महाराजांना अर्पण करत असतात
*मा.सौ.ताईंनी महाराजांचे स्मारकाचे छत गळके झाल्यामुळे दुरुस्ती खर्चासाठी स्वतःच्या गळ्यातील मंगळसूत्र मोडून छताचे काम केले परंतु सदरचे महाराजांचे शिवस्मारक जीर्ण झाले होते म्हणून त्यासाठी फार मोठा खर्च अपेक्षित होता त्यासाठी सौ.ताईंनी आमरण उपोषण करून त्या उपोषणाची दाखल नांदगावचे कर्तव्यदक्ष म.आमदार साहेबांनी दाखल घेवून सुमारे २० लक्ष रुपयाचा निधी तत्काळ मंजूर करून महाराजांचा पुतळ्यासह सुशोभीकरणासह सुसज्य काम करण्यात आले महाराष्ट्रातील प्रत्येक महिलांनी पुरुषांनी मा.सौ.संगीताताई सोनवणेचा आदर्श घ्यावा मा.सौ.ताईं च्या आज उत्कृष्ठ कामाबद्दल मा.सौ.ताईंना विविध १३ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
मा.सौ.ताई दर रविवारी मुलींना मोफत कराटे प्रशिक्षण देत असतात तसेच प्रत्येक गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवचरित्राचे प्रबोधन करून जनजागृती करीत असतात
*मा.सौ.संगीताताई सोनवणे चा आदर्श सर्व तळागाळातील छत्रपती शिवाजी महाराज चाहत्यांनी अनुकरण करावा*
मा.सौ.मा. संगीताताई सोनवणे च्या कार्याचे बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशन महा.राज्य पाचोरा यांच्या आणि प्रतिष्ठा न्युज पोर्टल सांगली महाराष्ट्र राज्य तर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन .

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.