प्रतिष्ठा न्यूज

परमोरीचे उपक्रमशील शिक्षक नौशाद यांचा सत्कार

प्रतिष्ठा न्यूज /जावेद पिंजारी
वणी दि.२२ : परमोरी या गावात अतिशय आनंदात व उत्साहाने छत्रपती शिवाजी महाराज यांची  सार्वजनिक जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परमोरी चे उपक्रमशील व तंत्रस्नेही श्री नौशाद अब्बास यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिव जन्मोत्सव समिती यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परमोरीचा दिव्यांग विद्यार्थी साई दादाजी बकुरेने जिल्हा परिषद नाशिक अध्यक्ष चषक स्पर्धेत वैयक्तिक गायन स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक पटकावल्यामुळे त्याचा सत्कार शिवजन्मोत्सव समिती परमोरी यांच्यातर्फे करण्यात आला.
यावेळी साईला मार्गदर्शन करणारे व शाळेत सातत्याने नवनवीन उपक्रम राबवणारे व गुणवत्तेसाठी प्रयत्नशील असणारे नौशाद अब्बास सर यांचा संपूर्ण ग्रामस्थ व शिवजन्मोत्सव  समिती यांच्यातर्फे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
 कोविड काळात नौशाद यांनी राबवलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांमुळे विद्यार्थी अध्ययनात मग्न झाले, त्यामुळे अध्ययनात खंड पडू दिला नाही, झाडाखालची शाळा हा उपक्रमही राबवला.तसेच शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी मी ज्ञानार्थी नावाचे राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्नोत्तरे सोडवण्याच्या सरावासाठी शंभर  प्रश्नसंच तयार करून, मोबाईलवर एप्लीकेशन तयार करून विद्यार्थी व शिक्षकांना उपलब्ध करून दिले. महाराष्ट्र राज्यातील विविध विद्यार्थी व शिक्षकांनी या चाचण्या सोडवल्या. सातत्याने उपक्रम राबवत, केंद्रस्तर व बीट स्तरावर व तालुका स्तरावर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन परमोरी शाळेचे नाव उज्वल केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
 सरपंच नवनाथ काळोगे, उपसरपंच दिलीप केदार, ग्रामपंचायत सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश गांगोडे, शालेय व्यवस्थापन समिती सर्व सदस्य,शिक्षण समिती चे शिक्षण तज्ज्ञ केशव शिवले,विविध कार्य.सोसायटी सर्व सदस्य,शिक्षण प्रेमी नागरिक,परमोरी सर्व शिक्षक, तरुण, सर्व ग्रामस्थ,  मोठ्या संख्येने सार्वजनिक शिवजयंती साठी या ठिकाणी उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.