प्रतिष्ठा न्यूज

किसान विद्यालयात “आनंद नागरी” व राज्यस्तरीय “क्रीडारत्न” पुरस्कार प्राप्त शिक्षकाचा सत्कार संपन्न

प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट
उमरा : लोहा तालुक्यातील उमरा येथील किसान विध्यालयात दि.25 जानेवारी 2023 रोजी “आनंद नगरी” हा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक- एस. आर. मुंगल, हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून किसान कन्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका- एम.जी.शेख, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक- विश्वजित अमनवाड, यांचे हस्ते या शाळेतील शिक्षक व विध्यार्थी यांनी आयोजित केलेल्या “आनंद नगरी” या शैक्षणिक उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले.
तसेच नुकताच जिल्हा सांगली येथील प्रतिष्ठा फौंडेशनने तासगाव येथे “क्रीडारत्न” हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले याच विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक- एम.एम. बच्चेवार, यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी शाळेतील शिक्षक- पदमवार सर, रामजी पाटील पतसंस्थेचे चेअरमन- पी.व्ही.सिरसाट, एम.एम.बच्चेवार, व्ही.आर शिंदे, बि.डब्ल्यू. कदम, रायकवाड सर, जाधव सर, ए.डी.शिंदे, जी.बि.शिंदे, कार्यक्रमाचे संयोजक- आर.एम. शिंदे, ए.बी.शिंदे, जी.टि.सिरसाट, शादुल शेख, माधव यलगंधलवार, युनूस मोमीन, व शाळेतील सर्व विध्यार्थी पालक व गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.