प्रतिष्ठा न्यूज

सांगली मनपाकडून आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते “मेरी मिट्टी मेरा देश” शिलालेख फलक उद्घाटन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील उद्यानामध्ये आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत “मेरी मिट्टी मेरा देश” अभियानांतर्गत शिलालेखाचे उद्घाटन आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या शुभहस्ते व महापौर दिग्विजय सूर्यवंशी तसेच जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक बसवराज तेली, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली तृप्ती दोडमिशे, सांगली मिरज कुपवाड महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. तसेच वीरो को वंदन असे कार्यक्रम संपन्न करण्यात आले आहे. जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्वातंत्र सेनानी श्री माधवराव माने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. महापालिकेचे ब्रँड ॲम्बेसेडर दीपक चव्हाण यांच्या सुरेल देशभक्तीपर गीतांनी सर्व वातावरण मंगलमय झाले होते. यावेळी स्वातंत्र्यवीर व माजी सैनीक व त्यांचे नातलगांना शाल श्रीफळ देवून सन्मानीत करण्यात आले. स्वातंत्र्य सैनिक यांचे नातेवाईक व वीर जवान यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते . या कार्यक्रमाचे नियोजन उपायुक्त राहुल रोकडे , श्रीमती स्मृती पाटील यांनी केले होते. महापालिका शाळा क्र ७ बालगोपाल यांनी राष्ट्र पुरुषांची वेशभूषा करून कार्यक्रमाची शोभा वाढवली व साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते.
यावेळी गटनेते भारतीताई दिगडे, नगरसेवक राजेंद्र कुंभार, कल्पना कोळेकर, सविता मदने, संतोष पाटील, माजी नगरसेवक युवराज गायकवाड, गणपती साळुंखे, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे, नितीन शिंदे, काका हलवाई, उज्वला शिंदे, सचिन सागावकर, आरोग्य अधिकारी वैभव पाटील, प्रशासकीय अधिकारी अशोक मानकापूरे, बागा विभागाचे अधीक्षक गिरीश पाठक, स्वच्छता निरीक्षक, मुकदम व कर्मचारी आदि मान्यवर तसेच नागरिक देखील मोठ्या संख्येने होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास व्हटकर यांनी केले व राष्ट्रगीत, राज्य गीत गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.