प्रतिष्ठा न्यूज

एमटीईएस इंग्लिश स्कूल मध्ये विद्यार्थ्यांचा पद्ग्रहण समारंभ उत्साहात साजरा.

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली : महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी संचलित, एमटीईएस इंग्लिश स्कूल मध्ये विद्यार्थ्यांचा पदग्रहण समारंभ मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून सरोजिनी विजय चौगुले या उपस्थित होत्या. या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. प्रशालेतील चार हाऊस चे कर्णधार , उपकर्णधार , प्रशालेचा प्रमुख मुलगा व मुलगी यांची निवड करून त्यांना शपथ देण्यात आली.
          प्रमुख पाहुण्यांनी मुलांना मार्गदर्शन करताना जीवनामध्ये संघटन ,एकजूट खूप महत्त्वाची आहे,त्याचे महत्त्व त्यांनी उदाहणातून सांगितले. ‘ प्रयत्न करा, यश हमखास मिळते ‘असेही सांगितले.
          प्रशालेचे क्रीडा शिक्षक अतुल जाधव  व संदीप पवार यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट संचलन केले.या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष पृथ्वीराज
 ( बाबा ) देशमुख , उपाध्यक्ष डॉ. प्रसाद केळकर व सचिव  सुरेंद्र चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले. प्रशालेच्या प्राचार्या इंदिरा पाटील उपप्राचार्या अंजना कोळी यांचे विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन मिळाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशालेच्या सहशिक्षिका रुपाली पाटील यांनी केले. यावेळी सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.