प्रतिष्ठा न्यूज

‘द प्रभा’ ही आई विषयीचे ऋणानुबंध व्यक्त करणारी दर्जेदार साहित्यकृती – डॉ. सुरज चौगुले

प्रतिष्ठा न्यूज 
सांगली प्रतिनिधी : आई विषयी सहवेदना व्यक्त करणाऱ्या अनेक दर्जेदार साहित्य कलाकृती निर्माण झालेले आहेत. तथापि द प्रभा ही आई विषयीचे ऋणानुबंध व्यक्त करणारी दर्जेदार साहित्यकृती तिच्या स्मृतीदिनी प्रकाशित करणं हीच तिच्याप्रति खरी श्रद्धांजली आहे. असे प्रतिपादन डॉ. सुरज चौगुले यांनी व्यक्त केले.
डॉ. विनायक होनमोरे लिखित ‘द प्रभा’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रसंगी आपल्या अध्यक्षीय मनोगतात ते बोलत होते.
         डॉ.चौगुले पुढे म्हणाले की, आपल्या आईच्या स्मृतीचा गंध शब्द रूपात व्यक्त करणारा पुस्तकातील प्रत्येक शब्द हा भावस्पर्शी असून कुटुंब व्यवस्था बळकट करणारा आहे. सध्या विभक्त कुटुंब व्यवस्था फोफावली असताना एकत्रित कुटुंबामध्ये सर्वांना गुंफण, नात्याची वीण उसवू न देणं, प्रसंगांना खंबीरपणे सामोरे जाणे ही आईंची वैशिष्ट्ये आजच्या पिढीला मार्गदर्शक ठरतील असा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
        द प्रभा या पुस्तकाचे प्रकाशन श्री. लक्ष्मी चित्रमंदिर चे मालक मा. श्री. मधुकर होनमोरे, सौ वर्षा शिंदे आणि श्री संजय शिंदे यांच्या हस्ते तर सौ. सुलभा वाघ,  श्रीमती कमल ओंकार, श्री. विजय ओंकार, सौ. वासंती होनमोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. याप्रसंगी मा. श्री. संजय शिंदे यांनी मनोगत व्यक्त करताना स्वर्गीय सौ. प्रभा होनमोरे यांच्या स्मृतींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे स्वागत सौ. वर्षा शिंदे यांनी केले तर प्रास्ताविक डॉ. नंदिनी काळे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार सौ. प्रिया होनमोरे यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ शामल होनमोरे यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन डॉ. विनायक होनमोरे, सौ. भारती पिंपुडकर, श्री अभिजीत होनमोरे यांनी केले.
याप्रसंगी होनमोरे, ओंकार परिवारातील कुटुंबीय, आप्तेष्ट, नातलग, मित्रमंडळी उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.