प्रतिष्ठा न्यूज

हरिपूर रोडवरील पाणीपुरवठा सुरळीत

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी रात्रीचा दिवस करून घेतलेल्या मेहनतीला अखेर यश आले आहे. नागरिकांच्या त्यामुळे सांगली हरिपूर रोडवरील पाणी प्रश्न सुटला आहे. यामुळे नदीकाठच्या 20 हुन अधिक घरांमध्ये मुबलक पाणी मिळण्यास सुरवात झाली आहे. यामुळे स्थानिक  नागरिकांनी महापालिका पाणीपुरवठा विभागाचे आभार मानले आहेत.
सांगली हरिपूर रोडवर उत्तरेस नदीकाठी वास्तव्यास असलेली 20 हुन अधिक घरामध्ये मनपाचे पाणी कनेक्शन आहे. या घरांमध्ये पिण्याचे पाणी कमी दाबाने येत होते. याबाबत गेली 2 वर्षे पाणीपुरवठा विभागाकडे पाठपुरावा केला जात होता. मनपाआयुक्त सुनील पवार यांच्याकडेही नागरिकांनी आपली तक्रार दिल्यानंतर आयुक्त पवार यांनी पाणी पुरवठा अभियंता आप्पा आलकुंडे याना याबाबत तक्रार निवारण करण्याची सूचना केली होती. यानुसार शाखा अभियंता ए. एन. मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता एम. एम . जाफर व पाईप इन्स्पेक्टर मनराज साळुंखे यांनी आकाशवाणी केंद्रा जवळील नवीन पाण्याच्या टाकीला हरिपूर रोडची कनेक्शन जोडली आणि या भागाचा पाणी प्रश्न कायमचा निकालात निघाला आहे. त्यामुळे आता हरिपूर रोडवरील 20 घरांना स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठा होत असल्याने स्थानिक नागरिकांनी कनिष्ठ अभियंता एम. एम. जाफर व पाईप इन्स्पेक्टर मनराज साळुंखे यांचे कौतुक करीत यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल समाधान व्यक्त केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.