प्रतिष्ठा न्यूज

सोमवार पासून सांगली महापालिकेची व्याख्यान माला

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने प्रतिवर्षी वसंत व्याख्यानमाला आयोजित केली जाते. सन २०२४ हे वसंत व्याख्यानमाला आयोजनाचे २९ वे वर्ष अखंडीत चालू आहे. दिनांक ०८/०७/२०२४ ते दिनांक १०/०७/२०२४ अखेर वसंत व्याख्यानमालाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती उपायुक्त सौ.शिल्पा दरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

वसंत व्याख्यानमालाचे उदघाटन भा.प्र.से.आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता, यांचे शुभ हस्ते व अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत खोसे, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसुळ, उपायुक्त संजीव ओहोळ, उपायुक्त वैभव साबळे यांच्या सन्मानिय उपस्थित सोमवार दिनांक ०८ जुलै २०२४ रोजी सांय. ५.०० वाजता श्री सखी महिला मंडळ हॉल, हनुमान हॉटेल समोर विश्रामबाग सांगली येथे संपन्न होणार आहे.

त्यानंतर दररोज सांय ५.०० ते ७.०० वाजे पर्यत व्याख्यान संपन्न होणार आहे.

दिनांक ८ जुलै २०२४ रोजी श्री लक्ष्मणराव माने सातारा (उपराकर) विषय “माझ्या आयुष्याची चित्तर कथा” दिनांक ०९ जुलै २०२४ रोजी प्रा. बाबूराव गुरव तासगांव विषय “मृत्युचे चुंबन घेणारा महा कवि साने गुरुजी” व दि.१० जुलै २०२४ रोजी श्री गणेश मानगुडे किर्लोस्करवाडी विषय “ग्रामीण कथा कथन” या विषयावर व्याख्यान सादर होणार आहे

तरी या व्याख्यानमालेसाठी वेगवेगळ्या विषयावर व्याख्यानमालेचे आयोजन केले असून यासाठी नामवंत वक्त्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. वाचन संस्कृती वाढावी व शाळकरी व तरुण तरुणी मध्ये वाचन संस्कृती बरोबर सुसंस्कृतीपणा वाढवा या प्रमुख उदेशाने सदरची व्याख्यानमाला महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करणेत येते.
तरी आपल्या लोकप्रिय दैनिकामध्ये सदर बातमीस व्यापक प्रसिध्दी देऊन व्याख्यानमालेकेस जास्तीजास्त नागरिक उपस्थित राहणे बाबत आव्हान करणेत येत आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.