प्रतिष्ठा न्यूज

गगनबावड्याची माधवी जाधव मुलींच्या राज्य कबड्डी संघात निवड

प्रतिष्ठा न्यूज / तुकाराम पडवळ
गगनबावडा : गगनबावडा तालुक्यातील मणदूर येथील माधवी विठ्ठल जाधव हिची सतारा वर्षाखालील महाराष्ट्र राज्य मुलींच्या कबड्डी संघात निवड करण्यात आली आहे. ही निवड चाचणी बीड जिल्ह्य़ातील आष्टी या ठिकाणी नुकतीच घेण्यात आली.
महाराष्ट्र राज्याचा राष्ट्रीय स्पर्धेसाठी बारा मुलींचा कबड्डी संघ निवडण्यात आला असून कोल्हापूर जिल्हय़ातील माधवी ही या संघात एकमेव खेळाडू आहे. ही कबड्डी स्पर्धा जानेवारी महिन्यात राजस्थान मध्ये होणार आहे. गगनबावडा सारख्या ग्रामीण भागातील मुलीची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल माधवी जाधव चे सर्वत्र कौतुक होत आहे.
ती जिल्हा परिषदेच्या शिंगणापूर येथील विद्यानिकेतन क्रिडा शाळेत इयत्ता दहावी च्या वर्गात शिकत असून तिला क्रिडा शिक्षक जमादार , आई वडील यांचे मार्गदर्शन लाभले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.