प्रतिष्ठा न्यूज

गगनगड दत्त जयंती उत्सव बुधवारी : मंगळवार पासून विविध धार्मिक कार्यक्रम

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा, ता. ५ : गगनगडावरील रंगरंगोटी, विद्युत रोषणाई इत्यादी सर्व व्यवस्था झाली असून जय्यत तयारी झाली आहे. लक्षवेधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व विश्व गौरव सन्मान विभूषित महान योगी परमपूज्य गगनगिरी महाराजांची तपोभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गगनगडावर श्री दत्त जयंतीचा अपूर्व सोहळा बुधवारी (ता.७ )होत आहे. यानिमित्त गगनगडावरील आश्रमात भाविकांची मांदियाळी जमली आहे.
गगनगडावर जयंती सोहळ्यानिमित्त मंगळवारपासून सलग चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. वाल्मिकी पाटण पायी दिंडी,श्रमिक सेवा मंडळ मुंबई, श्री दत्त जयंती उत्सव समिती पनवेल, रत्नागिरी भक्त मंडळ,,संगमनेर दिंडी या सर्व दिंड्या गगनगडावर दाखल झाल्या आहेत. श्री क्षेत्र किल्ले गगनगड ट्रस्टच्या वतीने बुधवारी दत्त जयंतीचा मुख्य सोहळा गगनगड पठारावर साजरा होणार आहे.
मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता काकड आरती होईल, त्यानंतर आठ वाजता लघुरुद्र आरंभ,एक वाजता महानैवेद आरती व महाप्रसाद,सायंकाळी सात वाजता मंत्र पुष्पांजली व नामस्मरण, रात्री साडे आठ वाजता शेजारती.बुधवारी मुख्यदिवशी साडेपाच वाजता काकड आरती, साडेसहा वाजता दर्शन सोहळा, सकाळी आठ वाजता महारुद्र आरंभ, नऊ वाजता महाप्रसाद,एक वाजता आरती,सायंकाळी साडेसहा वाजता दत्त जन्म सोहळा, साडेआठ वाजता आरती व मंत्रपुष्पांजली, नऊ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम.
गुरुवारी पहाटे साडेपाच वाजता काकड आरती, आठ वाजता महारुद्र, दुपारी एक वाजता महारुद्र समाप्ती व आरती, साडेआठ वाजता आरती व मंत्र पुष्पांजली.
शुक्रवारी सकाळी दहा वाजता होम हवन होणार आहे. अशी माहिती गगनगडाचे विश्वस्त रमेश माने यांनी दिली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.