प्रतिष्ठा न्यूज

तासगाव पालिका आणि पोलीस स्टेशन येथे जागतिक ग्राहक दिन संपन्न…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:जागतिक ग्राहक दिनानिमित्त तासगाव पोलिस ठाणे आणि नगर पालिकेत ग्राहक प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.यावेळी पोलिस स्टेशन येथील कार्यक्रमात प्रमुख पाहुणे जागृत ग्राहक संघटनेचे कोल्हापूर विभागीय संघटक मिलींद सुतार यांनी आँनलाईन खरेदीमध्ये होणाऱ्या फसवणुकीपासून दूर रहायचे असेल तर मालाची खरेदी दुकानात जावून करावी,फसवणूकीची तक्रार दाखल करण्यापूर्वी आवश्यक ते पुरावे जमा करावेत,वस्तू खरेदी करताना पावती घ्यायला विसरु नये,तसेच  आपल्या दैनंदिन व्यवहारात आवश्यक असलेल्या कायद्यांची तोंड ओळख असणे गरजेचे आहे.ती माहिती नेटवर सहज उपलब्ध आहे.नवीन ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार कोणाही विरुद्ध २४ तासात केंव्हाही तुम्ही आँनलाईन तक्रार करु शकता. मात्र तक्रारी सोबत तुम्हाला मजबूत पुरावे सुध्दा द्यावे लागतात अशी माहिती दिली.या कार्यक्रमास अध्यक्षस्थानी पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ होते.आभार वाहतूक शाखेच्या सहा.निरीक्षक मायादेवी काळगांवे यांनी मानले.यावेळी पोलिस ठाण्यातील सर्व कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.
नगरपालिकेतील कार्यक्रमात बोलताना मिलींद सुतार यांनी तुमच्या कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची समस्या तुम्ही किमान समजून तरी घेतली पाहिजे, मग ती सोडवण्यासाठीचे मार्ग तुम्ही त्याला सांगू शकता.तसेच तुम्ही ग्राहक म्हणून नेहमी सजग राहिले पाहिजे मग तुमची कोणी फसवणूक करु शकणार नाही, फसवणूक झाल्यावर मार्ग शोधत बसण्यापेक्षा नेटवर उपलब्ध असलेले आवश्यक टोल फ्री नंबर्स,विविध वेबसाईटस्,शासन निर्णय बघायची सवय करुन घ्यायला हवी असे आवाहन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यालय अधिक्षक श्वेता कुंडले होत्या,आभार बांधकाम विभागातील विद्या शेटे यांनी मानले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.