प्रतिष्ठा न्यूज

सांगली जिल्हा अंनिसच्या अध्यक्षपदी व्ही.वाय.पाटील यांची निवड

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : डॉ.नरेंद्र दाभोलकर यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत व्ही.वाय.(आबा) पाटील (नागराळे,पलूस) यांची तर कार्याध्यक्षपदी डॉ.संजय निटवे (सांगली),जिल्हा उपाध्यक्ष पदी डॉ. सतीश पवार (तासगाव),दीपक कोठावळे (इस्लामपूर) तसेच जिल्हा सचिव पदी रवी सांगोलकर (जत), प्रकाश शिंदे (मायणी विटा) यांच्या निवडी सांगली येथे झालेल्या ‘अंनिस’ च्या जिल्हा बैठकीत जाहीर करण्यात आल्या.निवड समितीचे राज्य निरीक्षक म्हणून सुजाता म्हेत्रे,राहुल थोरात,फारुख गवंडी,वाघेश साळुंखे यांनी काम पाहिले.सांगली येथे झालेल्या ‘अंनिस’ च्या जिल्हा बैठकीत पुढील दोन वर्षाकरिता जिल्हा कार्यकारिणीची निवड सर्व सहमतीने केली.बुवाबाजी संघर्ष विभाग जिल्हा कार्यवाह नाना पिसे (आटपाडी), वैज्ञानिक जाणीव प्रकल्प विभाग जिल्हा कार्यवाह साधना धेंडे (कवठेमहांकाळ),सांस्कृतिक विभाग त्रिशला शहा (मिरज),महिला विभाग धनश्री साळुंखे (सांगली), डॉ.सुनीता माळी (कवठेमहांकाळ),विविध उपक्रम विभाग नूतन परीट(तासगाव), युवा विभाग संतोष गेजगे (जाडरबोबलाद जत),वार्तापत्र आणि प्रकाशन विभाग प्रमोद म्हेत्रे (मणेराजुरी तासगाव),मानसिक आरोग्य विभाग डॉ.घनश्याम कांबळे (इस्लामपूर),विनोद कांबळे (कवठेमहांकाळ),जातीअंत विभाग स्वाती वंजाळे (नांद्रे मिरज),सोशल मीडिया विभाग कैलास सुतार (विटा), श्रीकृष्ण कोरे (सांगली), कायदा विभाग एडवोकेट सिद्धार्थ काकडे (कुपवाड सांगली).
तसेच यावेळी अंनिसची जिल्हा सल्लागार समिती ही गठीत करण्यात आली.त्यामध्ये डॉ.बाबुराव गुरव (तासगाव),एड.सुभाष बापू पाटील (हणमंतवडीये,कडेगांव),डॉ.अमोल पवार (पलूस),इब्राहिम नदाफ (जत), प्रा.अमित ठाकर (सांगली),बाबुराव जाधव (तासगाव),मारुती शिरतोडे (वाझर खानापूर),महेश जोतराव (सांगली), सुनील भिंगे,नामदेव पिसे (आटपाडी), चंद्रकांत वंजाळे (सांगली), प्रा.वासुदेव  गुरव (तासगाव) यांचा समावेश आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.