प्रतिष्ठा न्यूज

नांदेड येथे अंनिसची राज्य कार्यकारिणीची बैठक 30 सप्टेंबरला – अनेक महत्त्वाचे निर्णय होणार- राज्यभरातील २०० पदाधिकारी उपस्थित राहणार

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी स्थापन केलेली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली ३३ वर्षे सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. समितीचे संपूर्ण महाराष्ट्रभर १५० हून अधिक शाखांतून कार्यविस्तारले आहे. वर्षातून दोन वेळा राज्य कार्यकारिणीची बैठक होऊन पुढील कामाचे नियोजन होत असते. यावेळी ही बैठक नांदेड येथे शुभारंभ मंगल कार्यालयात शनिवार दिनांक ३० सप्टेंबर आणि रविवार दिनांक १ ऑक्टोबर रोजी संपन्न होणार आहे अशी माहिती अंनिस कार्यकारणी सदस्य सम्राट हटकर, मुक्ता दाभोलकर, अण्णा कडलास्कर, मिलिंद देशमुख, राहुल थोरात, नंदिनी जाधव, प्रा. अशोक कदम, मुंजाजी कांबळे, डॉ. हमीद दाभोलकर, रामभाऊ डोंगरे, नंदिनी जाधव, प्रशांत पोतदार, राजीव देशपांडे, फारुख गवंडी, प्रकाश घादगिने यांनी दिली.

अंनिसच्या या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीसाठी प्रत्येक जिल्ह्यातील अंनिसचे जिल्हाकार्याध्यक्ष, शाखाकार्याध्यक्ष, सचिव आणि बारा विभागाचे राज्य कार्यवाहक, निमंत्रित, सक्रिय कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये पुढील सहा महिन्यांमध्ये करावयाच्या कामाचे नियोजन केले जाणार आहे. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय होणार असून राज्यभरातील २०० पदाधिकार्यांची उपस्थिती असणार आहे.

या राज्य कार्यकारिणी बैठकीचे उद्घाटन शनिवारी 30 सप्टेंबर रोजी सकाळी १० वा.ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश मोगले यांच्या उपस्थितीत होणार आहे. सायं. ६ वाजता मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हमीद दाभोलकर लिखित ‘भावनिक प्रथमोपचार’ या पुस्तकाचे प्रकाशन जेष्ठ मानसोपचार तज्ञ डॉ. दि.भा. जोशी यांच्या हस्ते आणि ग्रामीण तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. विजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

रविवारी १ आक्टोंबर रोजी सकाळी ७ वा. नांदेड शहरातून निर्भय मॉर्निंग वॉक काढण्यात येईल.दुपारी २ वाजता अंनिसच्या राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण सुप्रसिद्ध साहित्यिक आणि मानसोपचार तज्ञ डॉ. नंदकुमार मुलमुले यांच्या हस्ते होणार आहे. बैठकीचे संयोजन नांदेड अंनिसचे कार्यकर्ते सम्राट हटकर, एड.प्रदीप नागापूरकर, प्रा. सुलोचना मुखेडकर, कमलाकर जमदाडे, प्रा. डॉ. शिवाजी कांबळे, इंजि. शंकरराव खरात, भगवान चंद्रे, नितीन ऐंगडे, रवी देशमाने, कपिल वाठोरे, दत्ता तुमवाड, भाऊराव मोरे आदी करीत आहेत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.