प्रतिष्ठा न्यूज

गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट डी. एड्. कॉलेज, मिरज येथे महाकवी सुब्रमण्यम जयंतीनिमित्त माझ्या भाषेतून माझी स्वाक्षरी

प्रतिष्ठा न्यूज
मिरज : गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट संचलित गुलाबराव पाटील डी. एड्. कॉलेज, मिरज येथे मंगळवार दिनांक 12/12/2023 रोजी “भारतीय भाषा महोत्सव दिनानिमित्त“ माझ्या भाषेतून माझी स्वाक्षरी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
माझ्या भाषेतून माझी स्वाक्षरी या कार्यक्रमाचे उदघाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जेष्ठ विचारवंत बापू जाधव यांनी केले. त्यानी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात मराठी भाषेचे सौंदर्य, तिची विविधता, विविधतेतून एकता याचा आनंद जीवनामध्ये कशाप्रकारे द्विगुणित करावा हे विविध प्रकारच्या दैनंदिन जीवनातील घटनाद्वारे स्पष्ट केले.
या कार्यक्रमात डी. एड्. विभागातील अध्यापिका अस्मिता कोडग यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून एम. ए. मराठी मध्ये तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबददल त्यांचा सत्कार प्रमुख पाहुणे बापू जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमासाठी शैक्षणिक संकुलाचे समन्वयक प्राचार्य, सतिश पाटील उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य, डॉ. बिभीषण कराळे यांनी अध्यक्षीय मनोगतात भाषेचे महत्त्व विषद केले. या उपक्रमासाठी संस्थेचे संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील व विश्वस्त विरेंद्रसिह पाटील यांची प्रेरणा व सहकार्य मिळाले. यावेळी गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलातील विविध विभागाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन अस्मिता कोडग व दिव्या पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक व सूत्रसंचलन शितल वाघमोडे यांनी केले व आभार धैर्यशील पाटील यांनी केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.