प्रतिष्ठा न्यूज

तासगावात मनसेची आढावा बैठक; राज्य उपाध्यक्ष रावसाहेब कदम व सौ रेश्मा तपासे यांच्याकडून पदाधिकाऱ्यांना सूचना..

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने पक्षाचे सरचिटणीस योगेश परुळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ते,साधन-सुविधा व आस्थापना विभागाचे कार्याध्यक्ष व पक्षाचे राज्य उपाध्यक्ष रावसाहेब कदम यांच्या सोबत महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा सौ. रेश्मा (ताई) तपासे यांनी सांगली जिल्ह्यातील जिल्हा संघटक अमोल काळे व इतर पदाधिकाऱ्यांसोबत तासगाव येथे आढावा बैठक घेऊन,पदाधिकारी यांच्या कडून केलेल्या कामाची माहिती घेतली व आगामी निवडणुका  ताकतीने लढल्या पाहिजेत तसेच पक्ष संघटना मजबूत झाली पाहिजे व राजसाहेब ठाकरे यांचे विचार घराघरात पोहचवण्याचा पदाधिकाऱ्यांनी जोरदार प्रयत्न केला पायजे अश्या सूचना केल्या.यावेळी तासगावातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाल्या.यावेळी महेश शिंदे,अनिल नाईक,प्रसाद खवाटे,परशुराम खांडेकर,प्रवीण जमदाडे,शशिकांत शिंदे,हणमंत रकटे,उमेश वाघ,प्रशांत कोकाटे,पवन बोबडे,आकाश वाघ, पवन मंडले,जालिंदर चव्हाण,रोहित सूर्यवंशी,सुशांत माने,राजेंद्र जाधव, सागर सुतार इत्यादि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.