प्रतिष्ठा न्यूज

राजर्षी शाहू विद्यालयात संविधान दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय खेळाडू कु. लता उमरेकर हिचा सत्कार

प्रतिष्ठा न्यूज/ राजीव पवार
नांदेड दि.27 : राजर्षी शाहू विद्यालय वसंत नगर नांदेड येथे 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून संविधानाचे मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन करण्यात आले.
संविधान दिनाचे औचित्य साधून शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू आंतरराष्ट्रीय पॅराऑलम्पिक बॅडमिंटन स्पर्धेत कांस्यपदक विजेतेपद मिळवलेली कु.लत्ता परमेश्वर उमरेकर, राष्ट्रीय शूटींगबाॅल स्पर्धेत सुवर्णपदक विजेती कु. पायल पंदीलवाड आणी राष्ट्रीय शूटींगबाॅल स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व केलेला अभिजीत जाधव यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
सामान्य कुटुंबात ,खेडेगावात जन्मलेल्या कु.लता हिने गेल्या चार वर्षांच्या काळात पॅरालिम्पिक खेळात गरुड झेप घेतली आहे.
जपान मध्ये 2022 मध्ये घेण्यात आलेल्या खेळाच्या स्पर्धेत पेरू या देशाचा पराभव करून पॅरालम्पिक बॅडमिंटन खेळात कास्य पदक प्राप्त केले. तिने अंतिम सामन्यात पेरू या देशास हरवले.भारताला विजय मिळवून दिला.
राष्ट्रीय स्पर्धेत पदक विजेत्या खेळाडूंना क्रीडा शिक्षक टी.एन. रामनबैनवाड यांचे मार्गदर्शन लाभले.अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री बालाजी हंगरगे, उप मुख्याध्यापक डॉ.पांडुरंग यमलवाड, प्रा. सुभाष तिवडे सर, सहशिक्षिका श्रीमती निर्मला खुळे ,श्रीमती कांता जायेभाये, श्रीमती सुनिता पावसे ,श्रीमती गायकवाड मॅडम , राजेश कदम , कला शिक्षक राजेश मोरे, स्काऊट मास्तर राजू पवार, गोपाळ मोरे, आदी शिक्षक उपस्थित होते.
तसेच यावेळी शिक्षक- विद्यार्थी यांच्या वतीने एक मिनिटे स्तब्ध राहून मुंबई हल्ला सन 26/11 / 2008 प्रकरणी कर्तव्य बजावतांना शहीद झालेल्या पोलीस कर्मचारी,अधिकारी यांना शाळेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.