प्रतिष्ठा न्यूज

पंढरपूर सिंहगडच्या अनुजा पाटील आणि आकांक्षा पवार यांना राष्ट्रीय पारितोषिक

प्रतिष्ठा न्यूज
पंढरपूर प्रतिनिधी : झेप संघटना द्वारे जागतिक डिजिटल डीटाॅक्स दिवसाचे औचित्य साधून “तंत्रज्ञान, मोबाईल आणि इंटरनेट” यांचे मनावर होणारे फायदे आणि दुष्परिणाम या विषयावर ऑनलाईन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मधील इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या कुमारी अनुजा पाटील हिने द्वितीय तर कुमारी आकांक्षा पवार हिने उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
जागतिक स्तरावरील झेप संघटनेने जागतिक डिजिटल डीटाॅक्स दिवसानिमित्त “डिजिटल डीटाॅक्स काळाची गरज या स्वरूपात स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत स्पर्धकांनी स्वतःचे विचार नाटक, कविता, भारूड, प्रार्थना आदी विषयांवर विचार व्यक्त करायचे होते. यातील नाटक स्वरूपात पंढरपूर सिंहगडच्या आकांक्षा पवार हिने “तंत्रज्ञान, मोबाईल आणि इंटरनेट” यांचे मनावर होणारे फायदे आणि दुष्परिणाम विचार व्यक्त केले होते.
आंतरराष्ट्रीय डिजिटल डीटाॅक्स काळाची गरज या स्पर्धेचे बक्षीस वितरण ५ डिसेंबर २०२३ रोजी मुंबई येथील गेट वे ऑफ इंडिया येथे मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण सोहळा होणार आहे.
राष्ट्रीय स्तरावरील कुमारी अनुजा पाटील हिने द्वितीय तर कुमारी आकांक्षा पवार हिने उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केल्याबद्दल प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, पब्लिकेशन्स डीन डॉ. संपत देशमुख, इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.