प्रतिष्ठा न्यूज

नायगाव येथील- मराठा सेवा संघाच्या आयोजित वधू- वर परिचय मेळाव्यात दोनशे वधू- वरांचा सहभाग

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
उमरा :- नायगाव तालुका मराठा सेवा संघाच्या वतीने नायगाव येथील साईतीर्थ मंगल कार्यालय, शेळगाव रोड, नायगाव येथे मराठा समाजातील वधू- वर परिचय भव्य दिव्य स्वरूपात मेळावा घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी- माजी आमदार मा. वसंतराव पाटील चव्हाण हे होते तर उद्घाटक म्हणून नायगावच्या तहसीलदार- शिवमती मंजूषा भगत मॅडम, तर प्रमुख पाहुणे म्हणून- प्रा.संतोष देवराये, जिल्हाध्यक्ष- उद्धव पाटील सुर्यवंशी, जिल्हा सचिव- रमेश पवार, नायगाव तालुकाध्यक्ष- अशोक पाटील पवळे, सचिव- संतोष कल्याणे, अशोक पाटील बावणे, राजू पाटील बावणे, माजी गटशिक्षणाधिकारी- एम.जे. कदम सह मराठा समाजातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
दि.24 डिसेंबर रोजी आयोजित या वधू- वर परिचय मेळाव्यात जवळपास 200 वधू- वरासह त्यांचे आई वडील व नातलग यांनी सहभाग घेऊन वधू- वर  परिचय करून देण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष तथा माजी गटशिक्षणाधिकारी- शिवश्री अशोक पाटील पवळे, सचिव- शिवश्री संतोष पाटील कल्याण, कार्याध्यक्ष- शिवश्री देवीदास जाधव, शिवश्री- नारायण शिंदे, शिवश्री- आनंद पवार, शिवश्री- बी.जी. चव्हाण, शिवश्री- नागेश पाटील कल्याण, शिवश्री- हणमंत जाधव, शिवश्री- व्ही.सी.जाधव, शिवश्री- जी.एम.शिंदे, यासह अनेकांनी हा भव्य दिव्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोठे योगदान दिले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.