प्रतिष्ठा न्यूज

आषाढीच्या निमित्ताने कुपवाड गावात टाळ मृदुंगाच्या गजरात दिंडी संपन्न

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
कुपवाड : महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये आषाढी एकादशी व तिच्या वारीचे अनन्य साधारण महत्त्व आहे. या एकादशीचे औचित्य साधत महाराष्ट्रातील अनेक ठिकाणाहून विठुरायाच्या भेटीला म्हणजेच पंढरीला भक्तगण पायी चालत येत असतात व माऊलीचे दर्शन घेतात. बऱ्याच जणांना काही अडचणींमुळे या विठुरायाचे दर्शन घेता येत नाही असे भाविक आपल्या जवळपासच्या मंदिरामध्ये विठू माऊली चे दर्शन घेतात. अशीच काही परिस्थिती कुपवाड ग्रामस्थांची होते कारण या गावांमध्ये विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर नाही याचाच विचार करून सौ सुमनताई सुरेश भाऊ खाडे व माजी नगरसेवक तथा सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी गावांमध्येच पंढरी व वारी करण्याचा निर्धार केला व आषाढी एकादशीचे दिवशी मातोश्री तानुबाई दगडू खाडे पब्लिक स्कूल मालगाव येथील शिक्षक व विद्यार्थी यांच्या मदतीने एका सुंदर शिस्तबद्ध दिंडीचे आयोजन केले या दिंडीची सुरुवात दास बहुउद्देशीय विश्वस्त संस्थेच्या कार्यकारी अधिकारी स्वाती सुशांत खाडे व  प्रकाश ढंग तसेच भाजपा पदाधिकारी यांच्या हस्ते आरती व श्रीफळ अर्पण करून करण्यात आली या दिंडीचा मार्ग कुपवाड मधील मिरज रस्त्यावरील महादेव मंदिर पासून सुरुवात होऊन थोरला गणपती चौक मार्गे लिंगायत गल्लीतून कुपवाड चावडी पर्यंत होता यावेळी गावकऱ्यांनी भाऊक होऊन या वारकऱ्यांच्या पायावर पाणी  घालत हळदी कुंकू लावून स्वागत करण्यात आले. त्यानंतर खाडे स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अभंग, भजन, नृत्य अशाप्रकारे सांस्कृतिक कार्यक्रम करून सर्व वातावरण भक्तीमय केले. यावेळी सर्व मान्यवरांचा सत्कार समारंभ घेण्यात आला. यावेळी स्वाती खाडे यांनी आयोजकांचे तोंड भरून कौतुक केले व महाराष्ट्र संस्कृतीचा वसा जपत असल्याने आभार मानले.
            या दिंडीस संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती सुशांत खाडे, माजी नगरसेवक तथा सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग स्कूलच्या समन्वयक ज्योत्स्ना माने, स्कूलच्या मुख्याध्यापिका संगीता पाटील व सुप्रिया पाटील, शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी  तसेच भाजपा पदाधिकारी रेखाताई इंगळे, मोहन (बापू) जाधव, रवींद्र सदामते, प्रकाश पाटील, मुकुंद चव्हाण, नवनाथ खिलारे, प्रभाकर वनखंडे, संजय वनखंडे, मच्छिंद्र वनखंडे, बापूसो हाके, अनिता रुपनर, लता कांबळे, बाबासाहेब सातपुते आदी उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.