प्रतिष्ठा न्यूज

लेट बाळासाहेब दरुरे इंटरनॅशनल स्कूल मध्ये ७४ वा प्रजासत्ताक दिनानिमित्त ५०० विद्यार्थ्यांचा ऐतिहासिक ऍक्शन डान्स

प्रतिष्ठा न्यूज/योगेश रोकडे
सांगली : मिरज मल्लेवाडी येथील लेट बाळासाहेब दरुरे इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे संस्थापक सावनकुमार दरुरे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अगदी शिस्तबद्ध पद्धतीने संचलन करून राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना दिली.
 या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे स्कूल व कॉलेजच्या पाचशे विद्यार्थ्यांनी एकत्रित केलेला नृत्याविष्कार , या नृत्याविष्काराचे गर्दी केलेल्या पालकांनी भरभरून कौतुक केले. असा नृत्याविष्कार पश्चिम महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमतः यशस्वीरित्या पार पडला.
 या कार्यक्रमासाठी शाळेच्या सेक्रेटरी सारिका दरुरे, कॉलेजचे समन्वयक सदाशिव आवळेकर, स्कूल समन्वयक सागर कांबळे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशा लोंढे  तर आभार प्रदर्शन सागर कांबळे यांनी केले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.