प्रतिष्ठा न्यूज

अंधश्रद्धा निर्मूलन समिती तासगावची कार्यकारिणी जाहीर

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : अंधश्रद्धा निर्मूलन समिती तासगाव तालुक्यासाठीची कार्यकारिणी बुधवारी झालेल्या बैठकित जाहीर करण्यात आली. बैठकीमध्ये सर्वानुमते तालुका अध्यक्षपदी छायाताई खरमाटे व तालुका उपाध्यक्षपदी हेमलता बागवडे यांची एकमताने निवड करण्यात आली. बैठकीच्या सुरुवातीला अंनिसचे हितचिंतक प्रसिद्ध व्यापारी आणि वारकरी संप्रदायाचे अभ्यासक हरिदास तात्या पवार यांना आदरांजली वाहून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
अंनिस तासगाव कार्यकारणी पुढील प्रमाणे:कार्याध्यक्ष – मा अमर खोत, प्रधान सचिव – मा.अविनाश घोडके, कायदेविषयक सल्लागार -ॲडव्होकेट एम ए मुजावर,विविध उपक्रम कार्यवाह – मा.विशाल खाडे,वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प कार्यवाह -मा.नुतन परिट,बुवाबाजी संघर्ष कार्यवाह -मा.समीर कोळी,वार्तापत्र व प्रकाशन- मा.प्रकाश थोरात,सांस्कृतिक विभाग -मा.शंकरराव पाटील,युवा विवेक वाहीनी-प्रा.श्रीधर शिंदे,युवा विभाग -कु.श्रेया परिट,सोशल मिडिया -मा.वैभव गुरव, प्रशिक्षण विभाग -प्रा.संजय कांबळे,महीला सहभाग कार्यवाह -मा.गितांजली सुतार,  मा.शोभा जाधव- जातीअंत संकल्प विभाग -मा.अंकुश जाधव, मानसिक आरोग्य व व्यसनमुक्ती विभाग -डाॅ.पंकज गायकवाड,डॉ.स्नेहल गुरव, सल्लागार – मा.पांडुरंग जाधव, मा.सुभाष देशमुख.  मा.संचिता सावंत मॅडम.
यावेळी निरीक्षक म्हणून राज्य कार्यकारणी सदस्य सुजाता म्हेत्रे यांनी काम पाहिले.आभार जिल्हाध्यक्ष बाबूराव जाधव यांनी मानले.यावेळी महिला आता अंनिस सारख्या सामाजिक कामात मोठ्या संख्येने येत असल्याने अंधश्रद्धा निर्मूलनाची अवघड लढाई सोपी होणार आहे. असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. जमलेल्या पदाधिकारी आणि  कार्यकर्त्यांनी अभ्यासक्रमातून डार्विन  चा उत्क्रांती सिध्दांत वगळल्या बद्दल निषेध पत्रे लिहून विरोध नोंदविला.
बैठकीस प्रा वासुदेव गुरव,मा.अर्जुन थोरात,मा.शरद शेळके,मा.विकास यादव उपस्थित होते.बैठकीची सांगता प्रसिद्ध  “आम्हीं प्रकाश बीजे,रुजवीत चाललो,वाटा नव्या युगाच्या रूळवीत चाललो या गाण्याने झाली.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.