केंब्रिज स्कुलच्या विद्यार्थ्यांची चांद्रयान 3 च्या सुरक्षित लॅंडींगसाठी शुभेच्छा!
प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुल, मिरज येथील संयोगिता पाटील केंब्रिज स्कुलच्या विद्यार्थ्यांनी INDIA असे इंग्रजी मध्ये अक्षरे तयार केली व तेथे चांद्रयान 3 ची प्रतिकृती ठेवली. यावेळी विध्यार्थ्यांनी चांद्रयानच्या सुरक्षित लॅडींगसाठी शुभेच्छा दिल्या व सुरक्षित लॅडींग करीता प्रार्थना केली.
चांद्रयान 3 आज सायंकाळी चंद्रावर लॅडींग करणार असल्याने विद्यार्थ्यांनी त्याच्या सफलतेच्या शुभकामना दिल्या व असा अनोखा प्रयोग करून शुभेच्छा दिल्या. चांद्रयान हे दक्षिण ध्रुवावर लॅण्ड होणार असून त्यांच्या सुरक्षित लॅडींगसाठी शुभेच्छा देण्याकरीता असा प्रयोग केल्याचे मुख्याध्यापिका सौ. श्रीदेवी कुल्लोळी यांनी सांगितले. यावेळी कॅम्पस कोऑडीनेटर सतिश पाटील, मुख्याध्यापक साहेबलाल शरीकमसलत सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.