प्रतिष्ठा न्यूज

राजर्षी मध्ये मराठवाड्याचे भगीरथ, जलनायक माजी केंद्रीय मंत्री, कै.शंकरराव चव्हाण यांची जयंती उत्साहाने साजरी

प्रतिष्ठा न्युज/ राजू पवार
नांदेड : शहरातील राजर्षी शाहू विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये मराठवाड्याचे भगीरथ कै. शंकरराव चव्हाण यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.
शाळेचे मुख्याध्यापक श्री बालाजी हंगरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक श्री पंजाबराव सावंत यांच्या हस्ते मराठवाड्याचे भगीरथ,जलक्रांती चे प्रणेते, कै.शंकरराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून स्मृतीस अभिवादन करण्यात आले.
यावेळी पर्यवेक्षक श्री सावंत यांनी कै. डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या कार्याचा गौरव केला. तसेच प्रास्ताविक मार्गदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख शिवानंद टापरे यांनी केले. याप्रसंगी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि छात्र अध्यापक ( बी.एड) विद्यार्थी यांनी कै.चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.
याप्रसंगी क्रीडा शिक्षक टी.एन.रामनबैनवाड, आनंद मोरे, श्री सुर्यकांत टापरे, नागनाथ केंद्रे,आर.एच.कदम,डाॅ. एम.एम.गाडेकर ,श्रीमती पावसे,श्रीमती खुळे,श्रीमती कांता जायेभाये,शिक्षकेतर कर्मचारी जाधवबाई,श्रीमती घोडेकरबाई,श्रीमती लक्ष्मीबाई वानोळे आदी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.