प्रतिष्ठा न्यूज

सांगली जिल्ह्यातील काही प्रशासकीय तसेच सांगली मिरज आणि कुपवाड महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या प्रॉपर्टीची चौकशी लावणार : चंदनदादा चव्हाण यांचा इशारा

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : जिल्ह्यातील काही प्रशासकीय अधिकारी तसेच सांगली मिरज आणि कुपवाड महानगर पालिकेचे अधिकाऱ्यांच्या प्रॉपर्टीची माहिती आयकर विभाग, सीबीआय, लाच लुचपत विभाग यांना देऊन त्यांची चौकशी लावणार आहे, असा इशारा गुंठेवारी चळवळीचे जनक शिवसेना गुंठेवारी समितीचे प्रदेशाध्यक्ष चंदनदादा चव्हाण यांनी दिला आहे.

प्रशासना मध्ये सर्व सामान्य नागरिकांना आपली कामे विविध कार्यालयामध्ये करून घेण्यासाठी मोठ मोठ्या रकमा द्याव्या लागतात प्रशासन पूर्णपणे भ्रष्ट झालेले आहे त्यामुळे सर्व सामान्यांची कामे प्रशासकीय कार्यालयात केली जात नाहीत त्यासाठी नागरिकांना पैसे मोजावे लागतात हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे या अधिकाऱ्यांना शासन पगार देत नसेल तर यांना सांगलीकरांच्या वतीने प्रत्येक विभागाच्या दारात लवकरच सांगली शहरांमध्ये दारोदारी जाऊन भीक गोळा करून लोकशाही मार्गाने ठेवली जाईल .यासाठी लवकरच शिवसेना गुंठेवारी विकास समिती भूमिका जाहीर करत आहे त्याच बरोबर प्रशासकीय सर्व विभागाचे अधिकारी असतील महानगर पालिका विभागातील सर्व अधिकाऱ्यांना आता चाप लावण्याची गरज आहे आणि म्हणून मी तमाम सांगली जिल्ह्यातील जनतेला आव्हान करू इच्छितो की कोणताही अधिकारी आपल्या कामासाठी पैसे मागत असेल तर त्याची तक्रार आपल्या लाचलुचपत विभागाला तात्काळ गोपनीय माहिती द्या व आमच्या समितीला गोपनीय तक्रार अर्ज देऊन जसे मच्छी माराला आपल्या जाळ्यात मासे पकडता येतात त्याच पद्धतीने अशा अधिकाऱ्यांना आपणाला घराकडे घालवण्याची चळवळ येत्या काळात राबवावी लागेल यासाठी सर्वांनी सज्ज राहावे असे आव्हान *प्रदेशाध्यक्ष चंदनदादा चव्हाण शिवसेना गुंठेवारी विकास समिती महाराष्ट्र राज्य. ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) यांचे वतीने करण्यात येत आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.