प्रतिष्ठा न्यूज

तासगावात अक्षय पाटील,शरद शेळके,विशाल शिंदे प्रवीण पाटील या मराठा तरुणांच्या आमरण उपोषणास सुरुवात… निर्णय होईपर्यंत तालुक्यातील अनेक गावात नेत्यांना गावबंदी

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : मराठा समाजाला शाश्वत आणि कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळावे,या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे – पाटील यांनी गेल्या चार दिवसांपासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे,या उपोषणास पाठिंबा म्हणून तासगाव तालुक्यातही आजपासून मराठा समाज आमरण उपोषणास बसत आहे.येत्या काही दिवसात आंदोलनाची दिशा व्यापक करून त्याची तीव्रता वाढवण्यात येणार आहे, असेही सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले आहे.जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात मराठा योद्धा मनोज जरांगे – पाटील यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे,सरकारने कायद्यात बसणारे आरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यासाठी सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे असे त्यांनी सरकारला सुचवले आहे.मात्र गेल्या दीड महिन्यांपासून सरकार केवळ कागदी घोडे नाचवत वेळकाढूपणा करत आहे.त्यामुळे सकल मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. राज्यभरात मराठा आंदोलनाची ठिणगी पेटली आहे.एकीकडे गांधीगिरी मार्गाने आमरण उपोषण सुरू असताना दुसरीकडे भगतसिंहांच्या मार्गाने आक्रमक आंदोलनही करण्यात येत आहे.
राज्यभरातून मनोज जरांगे – पाटील यांना प्रचंड पाठिंबा मिळत आहे. गावागावात लोक आमरण उपोषण करत आहेत.काही ठिकाणी आंदोलनकर्ते आक्रमक होत आहेत. याच पार्श्वभूमीवर तासगाव येथील समृद्धी मंगल कार्यालयात सकल मराठा समाजाची बैठक झाली. बैठकीत जोपर्यंत हक्काचे आरक्षण मिळत नाही तोपर्यंत लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आला. जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आजपासून अनेक जण तासगाव येथे उपोषणास बसणार आहेत.तर मशाल मोर्चासह अन्य आंदोलनाचीही तयारी करण्यात येत आहे.सरकारने शांततेत सुरू असणाऱ्या आंदोलनाची दखल घेऊन तातडीने आरक्षण द्यावे अन्यथा मराठा समाज जर पेटून उठला तर सरकारला सोसणार नाही,असा गर्भित इशारा यावेळी बैठकीत देण्यात आला. बैठकीस तासगाव तालुक्यातील मराठा समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.तालुक्यातील अनेक गावात आरक्षण मिळण्यासाठी मराठा बांधव आक्रमक होताना दिसत आहेत, अनेक गावात राजकीय नेत्यांना गावबंदी असे बोर्ड लावून निषेध केला जात आहें.आज पासून सुरु होत असलेल्या उपोषणास चिंचणीचें युवा नेते अक्षय पाटील,तासगाव येथील विशाल शिंदे,शरद शेळके,प्रवीण पाटील हे चार जण सायंकाळी 6 वाजल्यापासून आमरण उपोषणास बसले आहेत.
यावेळी एक मराठा लाख मराठा,छत्रपती शिवाजी महाराज की जय,अशा घोषणा देण्यात आल्या.तर तासगाव शहर व तालुक्यातील मराठा बांधव त्यांना व जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी साखळी उपोषण करणार आहेत.तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सावर्डे (ता. तासगाव) ग्रामपंचायतचे सदस्य,सरपंच परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख तथा शिवसेनेचे तासगाव तालुकाप्रमुख प्रदीप माने यांच्यासह हातनुर (ता. तासगाव) येथील ग्रामपंचायत सदस्य विश्वास पाटील हे आपल्या पदांचा राजीनामा देणार आहेत.तासगाव येथील सकल मराठा समाजाच्या बैठकीत त्यांनी ही घोषणा केली आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.