प्रतिष्ठा न्यूज

सुनील पाटील यांना प्रतिष्ठा फौडेशन सांगलीचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड : शहरातील विणकर कॉलनी येथील डॉ.राजेंद्र प्रसाद प्राथमिक शाळेचे उपक्रमशील व जिज्ञासू शिक्षक सुनील पोपटराव पाटील यांना सांगली येथील प्रतिष्ठा फौडेशनचा राज्यस्तरीय शिक्षणरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.
दि.4 फेब्रुवारी 2024 रोज रविवारी सकाळी 11:00 वाजता ग्रीन रोटरी हॉल तासगाव, जि.सांगली येथे जेष्ठ साहित्यीक, समिक्षक प्राचार्य डॉ.सुनीलकुमार लवटे रोल ऑफ ऑनर (भारत सरकार सन्मानित) यांच्या अध्यक्षतेखाली व सांगलीचे खासदार मा.संजयकाका पाटील, प्रबोधनकार ह.भ.प.तुकाराम बाबा महाराज, जेष्ठ साहित्यीक मा.वा.ह.मगदूम (पुणे जिल्हाध्यक्ष- गझल मंथन साहित्य संस्था, महाराष्ट्र राज्य ), जेष्ठ साहित्यीक मा.डॉ.सौ.जयश्री (माई) श्रेणीक पाटील (एक्स-रे, सोनोग्राफी, सीटी स्कॅन,एमआरआय तज्ञ) सदस्या बाल न्याय मंडळ, सांगली. पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद) व या कार्यक्रमाचे निमंत्रक तथा प्रतिष्ठा फौंडेशनचे अध्यक्ष- मा.तानाजीराजे जाधव, विद्याताई जाधव यांचे उपस्थितीत हा भव्य पुरस्कार सोहळा व आठवे साहित्य संमेलन संपन्न होणार आहे.
तसेच यावेळी मा.प्रा.डॉ.बाबूराव गुरव (ज्येष्ठ साहित्यिक) मा.प्रदिपकाका पाटील (अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र, अखिल भारतीय संरपंच परिषद), प्रा.संजय ठिगळे (सदस्य, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ महाराष्ट्र शासन), सौ.मुक्ता उमेश कळेकर (शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या, राष्ट्रीय कब्बडी खेळाडू), मा.शर्वरी पवार (अध्यक्ष- दुर्गा फौंडेशन, संपादक-तिचा जागर), मा.विक्रांत पाटील (प्रसिध्द युवा व्याख्याते), सौ.स्वप्नगंधा सागर बाबर (आदर्श ग्रामसेवक पुरस्कार, महाराष्ट्र शासन)
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.