प्रतिष्ठा न्यूज

कन्या महाविद्यालयात संविधान दिन साजरा

प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : मिरजेतील कन्या महाविद्यालयात राष्ट्रीय संविधान दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. राज्यशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थीनींनी संविधान शपथ घेतली. डॉ.शबाना हळंगळी यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले. भारतीय संविधान निर्मिती, संविधानातील तरतुदी, महत्व याबाबत प्रा. अभिनव औरादकर यांनी माहिती दिली.
या दिनाचे औचित्य साधून भारतीय संविधान या विषयावर शोधनिबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नऊ विद्यार्थिनींनी सहभाग घेवून शोधनिबंधाचे सादरीकरण केले. परीक्षक म्हणून अँड. योगेश नाडकर्णी यांनी काम पाहिले. यावेळी प्राचार्य डॉ.उल्हास माळकर, रासेयो प्रमुख डॉ.माधुरी देशमुख यांची उपस्थिती होती. एनसीसी विभागातील कॅडेट्सनी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून संविधान शपथ घेतली. या विविध उपक्रमांच्या आयोजनासाठी कनिष्ठ विभागाच्या उपप्राचार्या डॉ. सुनीता माळी, पर्यवेक्षिका नलिनी प्रज्ञासूर्य यांच्यासह प्राध्यापकांचे सहकार्य लाभले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.