प्रतिष्ठा न्यूज

नांदेड जिल्ह्यात दहशत व दादागीरी करणाऱ्याची गय केली जाणार नाही : खा.प्रतापराव पाटील चिखलीकर

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड : नांदेड शहरातील आसना पुलाजवळील काँफी सेटर समोर गुरुवर्य शहादत्त महाराज सरेगांवकर यांच्यावर काही तरुणानी हल्ला करून मारहाण केली होती. या घटनेचा निषेध करण्यासाठी आज जिल्ह्यातील  महाराजांच्या शिष्टमंडळाने जिल्ह्याचे खासदार मा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वसंतनगर नांदेड येथील “साईसुभाष” संपर्क कार्यालय येथे आले आसता या महाराजांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन जिल्ह्यातील महाराजांवरील होत असलेल्या दहशत व मारहाण घटनांची माहिती दिली असता खासदार यांनी या शिष्टमंडळाला दिलासा देत. या घटनेचा निषेध व्यक्त केला व अश्या व्यक्तीची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही. असे ते यावेळी प्रतिक्रिया देताना म्हणाले.
दि. 22 जून 2023 रोज गुरुवारी शहादत्त महाराज सरेगावकर हे काही कामानिमित्त नांदेड शहरात येत आसताना आसना पूलाच्या शेजारी काही गुंड प्रवृत्तीचे दोन तिन तरुणांनी महाराजां सोबत हुज्जत घालून विनाकारण मारहाण केली या घटनेची सोशल मिडियावर पडसाद उमटले व या घटनेची दखल खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यानी पूर्वीच घेऊन पोलिस प्रशासनाला खडे बोल सुनावले होते.
या घटनेचा निषेध करण्यासाठी जिल्ह्यातील अनेक मठसंस्थांचे मठाधिपती त्यात श्री गुरुवर्य यदुबन महाराज, आंनदबन महाराज, रुद्रागिर महाराज, रावसाहेब महाराज, यांच्या मार्गदर्शनाखाली एका शिष्टमंडळाने नांदेडचे जिल्हाधिकारी याना निवेदन दिले व त्या निवेदनाची प्रत खासदार मा.प्रतापराव पाटील चिखलीकर याना प्रत्यक्ष भेटुन दिली व जिल्ह्यात होत असलेले महाराजांवरील हल्ले थांबविण्याची मागणी केली. यावेळी अनेक गुरुवर्य महाराज सोबत उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.