प्रतिष्ठा न्यूज

पंढरपूर सिंहगड काॅलेज मध्ये स्पेक्ट्रम २के२२ उत्साहात संपन्न

प्रतिष्ठा न्यूज
पंढरपूर प्रतिनिधी : आयुष्यातील एक यशाच्या टप्प्यात आहात. पूर्वीचा काळ अन् आताचा काळ खुप वेगळा आहे. सद्या सगळे उपलब्ध आहे फक्त त्याचा वापर करणे आवश्यक आहे. हिच वेगळ आहे मस्ती व गोंधळ करण्याची पण करिअर सुद्धा करण्याची हिच वेळ आहे. मोबाईल खुप चांगल्या गोष्टी देत आहे. अजुन १० वर्षांनी खुप प्रगती होणार आहे. सर्वच क्षेत्रात देशाचा विकास होत आहे. आयुष्यात अपयश आले तर खचून जायचे नाही. प्रयत्न करत रहा यश निश्चित भेटेल. जीवनात एकञ काम करत असताना आपला राहणीमान सुसंस्कृत असले पाहिजे. सर्वांनी एकत्रित काम केल्यास यश भेटते. समाजातील नकारात्मक गोष्टीमध्ये न पडता स्वत:च्या व्यक्तिमत्वाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आईवडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून स्वत:चे व आईवडिलांचे स्वप्न पुर्ण करावे असे मत पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात आयोजित केलेल्या स्पेक्ट्रम २ के २२ या कार्यक्रमात बोलताना प्रसाद कुलकर्णी यांनी बोलताना व्यक्त केले.
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर मध्ये स्पेक्ट्रम २ के २२ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे प्रसाद कुलकर्णी, काॅलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, अँड. गुरूराज देशपांडे, स्पेक्ट्रम कार्यक्रम समन्वयक प्रा. ऋषिकेश देशपांडे आदी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रसाद कुलकर्णी यांचे काॅलेजचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. महाविद्यालयात राष्ट्रीय स्तरावरील आयोजित करण्यात आलेल्या “स्पेक्ट्रम २ के २२” या इव्हेंट मध्ये विविध महाविद्यालयातील एक हजार हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यामधील विविध इव्हेंट मधून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व बक्षीस मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुञसंचलन हर्षदिप कांबळे व श्रद्धा कुलकर्णी यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. ऋषिकेश देशपांडे यांनी मानले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.