प्रतिष्ठा न्यूज

कंधार मन्याड नदीवरील पूल पुनर्बांधणीसह इतर रस्त्यांसाठी 129 कोटी रुपये मंजूर : आ.शामसुंदर शिंदे.

प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट
उमरा : कंधार तालुक्यातील मन्याड नदीवरील पुलाच्या पुनर्वबांधनिसह,रस्ते व इतर पुलाच्या कामासाठी 129 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
कंधार शहरातील महाराणा प्रताप चौकाच्या चौपदरीकरण रस्ता व ग्रामीण रस्त्याच्या व नवीन पुलांचा समावेश आहे. सदर कामांना लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार सशामसुंदर शिंदे यांनी कंधार येथील आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

कंधार तालुक्यातील रस्त्यांची व पुलांची दयनीय अवस्था झाली आहे.महाविकास आघाडी सरकारच्या काळात लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाला भरभरून निधी मिळाला नसल्याने अनेक विकास कामे प्रलंबित होते. शिंदे-फडणवीस सरकार येताच पाठपुरावा करुन कंधार तालुक्यातील रस्ते व पुल बांधणीसाठी 129 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणण्यात आ. शामसुंदर शिंदे यांना यश आले आहे. विशेष म्हणजे बहादरपुरा येथील मान्यड नदीवरील पुल मोठ्या प्रमाणात डबघाईस झाला असल्याने अपघात होण्याच्या मोठी शक्यता लक्षात घेऊन या पुलाच्या पुनर्बांधणी कामासाठी भरीव निधीला आ.शिंदे यांनी मंजूरी मिळविली आहे. त्यामुळे या पुलाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. याच बरोबर नंदनवन बाल, कुरुळा नागलगाव, रस्ता दुरुस्ती, बारुळ गावातील सी सी रस्ता, घोडज कंधार बारुळ कोठा स्त्यावरील दुरुस्ती लाठ (खु), औराळ चिखली- दहिकळंबा या मार्गावरील पुल व रस्त्याची दुरुस्ती करणे या कामाचा समावेश आहे.

नांदेड येथुन आलेला महामार्ग पांगरा येथून बहादरपुरा येथे गेला असल्याने कंधारकरांची निराशा झाली होती. पांगरा -कंधार – घोडज या मार्गे रिंग रोड करा अशी मागणी जनतेकडून होत असल्याने या मागणीची दखल घेवून आ. शिंदे यांनी या सत्याच्या कामासाठी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेतला.
कंधार शहराचे वैभव लक्षात घेता बसवेश्वर महाराज स्मारक ते शिवाजी हायस्कूल पर्यंत दुपदरी व शिवाजी हायस्कूल ते महाराणा प्रताप चौक महाराणा प्रताप चौक ते जाधव हॉस्पिटल पर्यंत चौपदरी रस्ता होणार असल्याने कंधार शहराच्या वैभवात भर पडणार आहे.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर चोंडे, शेख शेरुभाई, वसंत मंगनाळे, अशोक सोनकांबळे, सचिन कल्याणकर, प्रमोद शिंदे यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.