प्रतिष्ठा न्यूज
आपला जिल्हा

उमरा येथे “आनंदाचा शिधा ” योजनेअंतर्गत किट चे वाटप- गरिबांची दिवाळी होणार गोड

प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट
उमरा : लोहा तालुक्यातील उमरा येथील एपीएल योजनेतील कुटुंब आणि अंत्योदय शिधापत्रिका धारकांना आज दि 21 ऑक्टोबर 2022 रोजी 400 कुटूंबांना त्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणुन” आनंदाचा शिधा” वाटप करण्यात आला.
यंदाची दिवाळी गोड होण्यासाठी राज्य सरकारने 100 रुपयांत शिधा वस्तूंचे पॅकेज जाहीर केले. यात रवा 1किलो, चणाडाळ 1किलो, साखर 1किलो, आणि पामतेल 1लिटर, या खाद्य वस्तूचा समावेश आहे. जिल्ह्यात प्रथमच लोहा येथे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते 19 ऑक्टोबर 2022 रोजी स्वस्त धान्य दुकानदारांना शिधा वितरित करण्यात आला होता.

त्याच अनुषंगाने आज उमरा येथे “आनंदाचा शिधा” योजनेअंतर्गत गावातील 400 लाभधारकांना प्रत्येकी 100 रुपये प्रमाणे “आनंदाचा शिधा” वस्तूंचे वाटप करून गरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी स्वस्त धान्य दुकानदार विठ्ठल सावकार परगेवार यांनी शासनाच्या नियमानुसार आपले काम पुर्ण केले.
या वेळी गावातील सज्जन पाटील सिरसाट, नागोराव माली पाटील, डॉ राजेश सिरसाट, तेजेराव मुकादम, रुपला नाईक राठोड, राधाबाई ढगे, सुमनबाई जोगदंड, राधाबाई पतलावे, आदीसह सर्व लाभधारक उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.