प्रतिष्ठा न्यूज

शरद पवार यांची भेट राजकीय नाही ; मी भाजपात समाधानी, भाजप सोडणार नाही : माजी खासदार संजय काका पाटील यांचे स्पष्टीकरण

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : भाजपाचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी काल पुण्यात शरद पवारांची भेट घेतली.या भेटीमुळे सांगली जिल्ह्यासह राज्यात  राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले.विधानसभा निवडणुकांच्या पार्श्व भूमीवर राज्यात अनेक घडामोडी होताना दिसत आहेत. अशातच काल अचानक संजय काका पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने ते शरद पवार गटात प्रवेश करणार का अशी चर्चा सुरु झाली. यावर प्रतिक्रिया देताना संजय काका पाटील म्हणाले,मी भाजपात समाधानी आहे,मी भाजपा सोडून कुठेही जाणार नसून,शरद पवारांसोबत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही.येत्या 4 तारखेला सांगलीत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण आहे.या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी पवार साहेबांची भेट घेतली असून, बाकी काही विषय नसल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.