प्रतिष्ठा न्यूज

महसूल विभागातील कामे अधिक लोकाभिमुख व पारदर्शकपणे करावी प्रांताधिकारी उत्तम दिघे यांचे प्रतिपादन

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : 1 ऑगस्ट महसूल दिनानिमित्त तासगाव तहसील कार्यालय येथे महसूल दिन उत्साहात साजरा करण्यात आला,तसेच दिनांक 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान पार पडणाऱ्या महसूल सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी प्रांत अधिकारी मिरज उत्तम दिघे, तहसीलदार अतुल पाटोळे,नायब तहसीलदार प्रकाश बुरुंगले,धनश्री स्वामी,शुभांगी सरोदे,निरीक्षण अधिकारी प्रियंका माळी यांचेसह सर्व मंडळ अधिकारी,ग्राम महसूल अधिकारी,तहसील कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.या प्रसंगी मागील वर्षभरामध्ये उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी कर्मचारी यांचा प्रातिनिधीक स्वरूपामध्ये प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.
उत्कृष्ट नायब तहसीलदार म्हणून प्रकाश बुरुंगले,निवासी नायब तहसीलदार तासगाव,उत्कृष्ट मंडळ अधिकारी म्हणून रविकिरण वेदपाठक सावळज,अव्वल कारकून श्रीमती सुजाता ढेरे,महसूल सहाय्यक बाळकृष्ण चव्हाण व विकास मदने,ग्राम महसूल अधिकारी संवर्गातून रामू कोरे,अंजनी व शितल पाटोळे वायफळे,पोलीस पाटील सतीष पाटील निमणी,महसूल सेवक संतोष सगरे शिरगाव वीसापूर,शिपाई लाड,श्रीमती मोटे,ऑपरेटर प्रफुल्ल बनसोडे यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.महसूल प्रशासन हे लोकांच्या दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी सदैव तत्पर असते लोकांना सेवा पुरवते या सेवा अधिक पारदर्शकपणे,गतिमानपणे व लोकाभिमुख असाव्यात यासाठी पुढील वर्षभरामध्ये कामकाज करावे असे कार्यक्रमाचे अध्यक्ष उत्तम दिघे प्रांताधिकारी मिरज यांनी सांगितले.तहसीलदार अतुल पाटोळे यांनी सुद्धा यावेळी मनोगत व्यक्त केले.या वेळेला महसूल खात्यातील जुनी परंपरा जमाबंदी केल्यानंतर जमीन महसुलाची 100% वसुली करण्याचा विडा उचलला जाण्याची जी परंपरा होती ती या वेळेला पुन्हा पाळण्यात आली.सर्व मंडळ अधिकारी,ग्राम महसूल अधिकारी यांनी विडा उचलून पुढील वर्षभरामध्ये 100% जमीन महसुलाची वसुली करण्याची ग्वाही दिली.या वेळेला अधिकारी कर्मचारी यांचे सोबतच नागरिक सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते.नागरिकांना सुद्धा प्रातिनिधीक स्वरूपात नवीन,दुबार रेशन कार्ड,जातीचे दाखले यांचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्राम महसूल अधिकारी प्रकाश पांढरे यांनी तर आभार प्रियांका माळी यांनी मानले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!