फौजी व पोलीस ब्रदर्स ग्रुप तर्फे निमणी येथील शहीद जवान कुटुंबास मदतीचा हात

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : ५ वा मैल निमणी येथील सैनिक श्रीकांत कुंडलिक सपकाळ यांचे दोन महिन्यापूर्वी दुर्धर आजाराने निधन झाले होते.त्यांचे कुटुंबास सहानुभूती पुर्वक मदत म्हणून फौजी व पोलीस ब्रदर्स ग्रुप सांगली जिल्हा यांचे वतीने आर्थिक मदत व कुटुंबीयास गौरव पत्र देण्यात आले.श्रीकांत यांच्या मातोश्री मानकाबाई सपकाळ,पत्नी मोनिका, भाऊ किरण यांनी गौरव पत्र स्वीकारले.फौजी व पोलीस ब्रदर्स ग्रुपचे पदाधिकारी सदस्य सूर्यकांत पाटील,अतुल किर्दक,कुमार पाटील, अक्षय सावंत, निमणी गावच्या सरपंच सौ रेखा रविंद्र पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, ग्रामपंचायत सदस्या शुभांगी सपकाळ,पोलीस पाटील सतीश पाटील,विनय सपकाळ,अजित शिरदाळे,बंडू जाधव,सतिश बुचडे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.