रामायणात भोगाची नाही तर, त्यागाची स्पर्धा-परमपूज्य समाधान महाराज शर्मा;श्रीराम कथेत बालकांड व आयोध्याकांडातील प्रसंग उभे

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : रामायणात भोगाची नाही, तर त्यागाची स्पर्धा होती. त्यामुळेच श्रीराम जेव्हा वनवासाला निघाले त्यावेळी श्री लक्ष्मण आणि सीता दोघेही त्यांच्याबरोबर वनवासासाठी तयार झाले. 17 जानेवारीपासून सांगलीतील कल्पद्रुम ग्राउंडवर मोठ्या दिमाकांत आणि धार्मिक वातावरणात पार पडत असलेल्या श्रीराम कथा व नामसंकीर्तन सोहळ्यातील श्री राम कथा सांगताना आज परमपूज्य समाधान महाराज शर्मा यांनी श्री रामाच्या बालकांड व अयोध्या कांडातील प्रसंग जसेच्या तसे उभे करत हजारो भक्तांना मंत्रमुग्ध करून सोडले. त्यावेळी त्यांनी सदर दाखला दिला.
प्रभू श्रीरामांनी माता कैकयीच्या सांगण्यानुसार 14 वर्षांचा वनवास हसत हसत स्वीकारला. श्रीराम त्यावेळी कैकयीला घेऊन नाचू लागले आणि मी या जगात कशासाठी आलो हे तुलाच माहित असल्याचे म्हणत आनंदीत झाले. सारी आयोध्या नगरी झोपेत असताना श्री लक्ष्मण व सीतेसह त्यांनी वनवासाला प्रस्थान केले हा प्रसंग ऐकताना भाविक भक्तांच्या डोळ्यात टचकन पाणी उभे राहिले.
सदर कथेच्या शेवटी महाआरतीसाठी परमपूज्य बजरंग झेंडे महाराज, श्रीराम कथेचे यजमान गुलशन कुमार अग्रवाल,श्री व सौ अविनाश चव्हाण तासगाव, श्री व सौ विश्वास पाटील, श्री व सौ विजयकुमार जी लोया, श्री व सौ प्रमोद मालू, श्री व सौ गोविंद बुबना, श्री व सौ सुरेंद्र बोळाज, श्री व सौ जयंत सावंत, श्री व सौ राजशेखर सावळे, श्री व सौ सुहास पाटील,श्री व सौ शंकर कदम, श्री व सौ मल्लिकार्जुन पट्टणशेट्टी, श्री व सौ मधुसूदन काबरा, श्री व सौ नंदकिशोर मालानी, श्री व सौ बन्सीलाल ओसवाल श्री व सौ रामकृष्ण श्रीनिवासा, सौ सुमन ताई सुरेश खाडे, सौ जयश्री दाभाडे,सौ ज्योत्स्ना माने, सौ कमला तोष्णीवाल, सौ सुरेखा तोष्णीवाल, सौ सुनीता तोष्णीवाल, आदी मानकरी उपस्थित होते. अशी माहिती श्री राम कथा व नामसंकीर्तन सोहळा समितीचे कार्याध्यक्ष मनोहरभाई सारडा यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
दरम्यान या धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक बांधिलकी म्हणून उद्या दिनांक 24 जानेवारी रोजी सकाळी आठ वाजल्यापासून सोहळा स्थळी रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याचे व या शिबिरामध्ये सांगलीतील हजारो नागरिकांनी रक्तदान करावे. असे आवाहन कार्याध्यक्ष मनोहरभाई सारडा यांनी पुढे बोलताना केले.