सांगली विधानसभा मतदार संघातील काँग्रेसच्या उमेदवारीचा वाद टोकाला; लोकसभेप्रमाणे बंडखोरी करून ‘सांगली पॅटर्न’ राबवू- पृथ्वीराज पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा इशारा
प्रतिष्ठा न्यूज
सांगली (प्रतिनिधी) – सांगली विधानसभा मतदार संघातील काँग्रेसच्या उमेदवारीचा वाद टोकाला गेला आहे. पक्षाने शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिली नाही तर लोकसभेप्रमाणे बंडखोरी करून ‘सांगली पॅटर्न’ राबवू. स्वाभिमानी सांगलीकरांच्या साथीने निवडणूक लढवू, असा इशारा श्री. पाटील यांच्या समर्थकांनी आज बैठकीत दिला. दहा वर्ष पक्ष जीवंत ठेवणाऱ्या आणि पाच वर्षे मेहनत घेणाऱ्या नेत्याला डावलून पक्षाने आत्मघात करू नये, असा इशारा देण्यात आला.
पृथ्वीराज पाटील यांच्या घरी बैठक झाली. काँग्रेस नेत्यांनी कोणाच्या दबावतंत्रामुळे घातकी निर्णय घेतला तर काँग्रेसचे नुकसान होणार आहे. पक्षाने सांगलीतील ग्राऊंड रिपोर्ट घ्यावा. पायावर धोंडा मारून घेऊ नये, असे आवाहन मराठा समाज संस्थेचे ए. डी. पाटील आणि माजी नगरसेवक किरण सूर्यवंशी यांनी केले.
ते म्हणाले की, काँग्रेस एकजुटीने लढली पाहिजे. पृथ्वीराज पाटील यांची उमेदवारीच भाजपचा पराभव करू शकते. आमदार विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील त्यांना त्याची खात्री आहे आणि तेच उमेदवारी मिळवून देतील. त्यांनी गेली दहा वर्षे संकट काळात पक्ष वाढवला आहे. गेली पाच वर्षे ताकदीने बांधणी केली आहे. सामान्य माणसापर्यंत पोहचून काँग्रेसच्या विचारांची मजबूत मोट बांधली आहे. कुणाच्या दबावामुळे त्यांना डावलण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला तर सांगलीकर जनता ते सहन करणार नाही. विशाल पाटील यांच्यावर अन्याय झाल्यानंतर ज्या ताकदीने सांगलीकर त्यांच्या पाठीशी उभे राहिले, त्याच ताकदीने पृथ्वीराज पाटील यांच्या पाठीशी उभे राहतील. ज्याने पक्षासाठी संघर्ष केला, त्याला बंड करायची वेळ आणू नये.
यावेळी माजी नगरसेवक रज्जाक नाईक, माजी उपमहापौर विजय घाडगे, डॉ. राजेंद्र मेथे, किरण सूर्यवंशी, अल्ताफ पेंढारी, शेरुभाई सौदागर, अजय देशमुख, शीतल सदलगे, अजिज शेख, अजीज मेस्त्री, नेमिनाथ बिरनाळे, अल्लाबक्ष काझी, अरविंद पाटील, सुनिल मोहिते, संजय काळोखे, ए. डी. पाटील, विक्रम कदम, महावीर पाटील, युवराज पाटील, गुरुप्रसाद चौगुले, सावळाराम शिंदकर, महावीर पाटील, विजय पाटील, श्रीकांत पाटील, दिनकर साळुंखे, महावीर पाटील, कांतीलाल कोठारी, सुरेश मालानी, अरविंद पाटील, माणिक कालेकर, योगेश पाटील, सुशांत पाटील, गणेश घोरपडे, सचिन कांबळे, वसीम नदाफ, विकास बोंद्रे, पृथ्वीराज बोंद्रे, ओंकार शेरीकर, विक्रम कांबळे सचिन पाटील दीपक परीट प्रदीप निंबाळकर तनिष्क जवळेकर, आदी उपस्थित होते.
———
विश्वजीत कदम यांचे
सोबत नेहमी राहणार
पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी डावलल्यास त्यांना अपक्ष लढवू. विश्वजीत कदम, विशाल पाटील हेच त्यांचे नेते असतील. ते आमदार झाल्यानंतरही विश्वजीत कदम हेच आपले नेते राहतील. आपण कुणीही काँग्रेसचा विचार सोडणार नाही, अशी भूमिका आशिष कोरी यांनी स्पष्ट केले.