विना परवाना देशी व विदेशी दारु विक्रीसाठी वाहतुक करणा-या इसमावर स्था.गु.अ. शाखेची कारकई एकुण २.२६,५४३/- रु. चा दारुचा व इतर मुद्देमाल हस्तगत

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : विना परवाना देशी व विदेशी दारु विक्रीसाठी वाहतुक करणा-या इसमावर स्था.गु.अ. शाखेने कारकई केली. संबंधितांकडून एकुण २.२६,५४३/- रु. चा दारुचा व इतर मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. महेश ऊर्फ पिंटु वसंतराव उबाळे, वय ४२ वर्षे, पत्ता वासुंबे रोड, विटा असे आरोपीचे नाव आहे.
गुन्हयाची थोडक्यात हकीकत अशी
सध्या महाराष्ट्रात विधानसभा २०२४ ची निवडणुक आदर्श आचारसंहिता लागु झालेली असुन ऐन निवडणुकीच्या काळात समाज विरोधी घटकांकडुन कोणताही अनुचित प्रकार घडु नये त्याअनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक, संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध व बिगरपरवाना दारु विक्री, वाहतुक व कब्जात बाळगणारे इसमाची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. सदर सुचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील उपविभागान्वये पथक तयार करण्यात आले आहे.
त्या अनुशंगाने दि. २६.१०.२०२४ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक, सिकंदर वर्धन यांचे पथकामधील पोहेकॉ हणमंत लोहार यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की, इसम नामे पिंटु उबाळे हा बेकायदा बिगरपरवाना विदेशी दारुचा साठा त्याचे ओमनी गाडीतुन विक्री साठी विटा ते नेवरी जाणारे रोडने घेवुन जाणार आहे.
नमुद पथक मिळाले बातमीप्रमाणे, विटा ते नेवरी जाणारे रोडवर संशयित वाहनावर वॉच करीत थांबले असता एक संशयित पांढरे रंगाचे ओमनी वाहन येत असताना दिसल्याने त्यास थांबवुन वाहन चालकास त्याचे नाव विचारता त्यांने त्याचे नाव महेश ऊर्फ पिंटु वसंतराव उबाळे, वय ४२ वर्षे, पत्ता वासुंबे रोड, विटा असे सांगितले. त्यास झडतीचा उद्देश कळवुन ओमनी गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये देशी दारु, विदेशी दारु व बिअरच्या बाटल्यांचे बॉक्स किं. रुपये ७६,५४३/- व चार चाकी ओमनी गाडी असा एकुण २,२६,५४३ रुपये किमंतीचा माल मिळुन आल्याने सहा. पोलीस निरीक्षक, सिकंदर वर्धन यांनी सदरचा माल पंचनाम्याने जप्त केला असुन आरोपी विरुध्द पोकों/ सुरज थोरात यांनी विटा, पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारुबंदी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास व कार्यवाही कामी विटा, पोलीस ठाणेकडे वर्ग केला आहे.